शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

कास पठारावरील दुर्मीळ फुलांचा सूर्यास्त!

By admin | Published: October 24, 2016 12:37 AM

मंगळवारनंतर शुल्क आकारणी बंद : कुमुदिनी तलावातील फुले पाहण्याची संधी उपलब्ध

पेट्री (सातारा) : साताऱ्याच्या पश्चिमेस असलेल्या कास पठारावर देश विदेशातून हजारो पर्यटकांनी आत्तापर्यंत भेट दिली. शाळा-महाविद्यालयांच्या सहलींतून भावी पिढीने पठारावरील फुलांच्या विश्वाची सहल केली. पठारावर वीस ते पंचवीस टक्के फुले दिसत आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचा सूर्यास्त झाला असून, मंगळवार, दि. २५ आॅक्टोबरपासून शुल्क आकारणे बंद करण्यात येणार आहे. कास-महाबळेश्वर मार्गावर तीन किलोमीटर अंतरावर पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागले आहे. या कुमुदिनी फुलांचा हंगाम साधारण दहा ते पंधरा दिवस राहणार आहे. जिल्ह्यातील कास पठार हे आंतरराष्ट्रीय जैवविविधता तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून सातासमुद्रापार विविधरंगी दुर्मीळ फुलांच्या गालिच्यासाठी परिचित आहे. पठारावरील हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पठारावर पर्यटक तसेच शाळा महाविद्यालयीन तरुणाईची गर्दी होताना दिसते. दरम्यान, येथील वनसंपत्ती पाहता अभ्यासू वृत्ती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली येत आहेत. परंतु सध्या फुलांचा हंगाम ओसरत चालल्याने गर्दी तुरळक दिसू लागली आहे. दरम्यान, पठारावर पर्यटकांची सतत रेलचेल असून, पठारावरील जैवविविधता पाहता कास पठाराची ख्याती जगभर पसरलेली आहे. लांब-लांबून पर्यटक दाखल होत आहेत. (वार्ताहर) दिवाळीत कमळ पाहायला यायचं ४दिवाळीपूर्वी फुलांचा हंगाम ओसरला जात असून, कुमुदिनी तलावातील कमळे दिवाळीच्या सुटीत विना शुल्क पाहता येणार आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा फुलांचा हंगाम उशिरा सुरू झाला असला तरी तो काही दिवस पुढे वाढला आहे. ४तुरळक फुलांभोवती गवत अधिक वाढल्याने सापांपासून सावध राहावे. पायवाटा व्यतिरिक्त इतरत्र पर्यटकांनी जाऊ नये. जेणेकरून सध्या शिल्लक असणारी फुले पायदळी तुडवले जाणार नाहीत. ४तसेच दि. २५ आॅक्टोबरनंतर शुल्क आकारणी बंद केली तरी फुलांच्या संरक्षणासाठी काही वन समितीचे कर्मचारी पठारावर राहणार आहेत, अशी माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समितीने ‘लोकमत’ला दिली.