जगदीश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : टीव्ही, चित्रपटांच्या दुनियेत नाटकांना चांगले दिवस नाहीत, रसिकांनीच पाठ फिरवल्याने कलाकारांना मानधनही देता येत नाही, असे सांगितले जात असले तरी साताऱ्यातील रश्मी साळवी या तरुण कलाकाराने हे सर्व विधान खोडून काढले आहेत. तिने केवळ पाच वर्षांपासून दहाहून अधिक नाटकांमध्ये काम केले असून, ‘गावकथा’मध्ये चक्क चार भूमिका साकारल्या आहेत.साताºयाला ऐतिहासिक महत्त्व आहेत. त्याचप्रमाणे सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रातही साताºयाने वेगळा ठसा उमठवला आहे. हौसी रंगभूमीवर साताºयातील अनेक कलाकार काम करत आहेत. यातूनच अनेक कलाकार चित्रपटसृष्टीत नावारुपासही आले आहेत.साताºयातील रश्मी साळवी हिने व्यावसायिक रंगभूमीवर स्वत:चे नाव कमावले आहे. गोची झाली ना, लवंगी मिरची कोल्हापूरची या नाटकांतून तिने २०१३ मध्ये नाट्यक्षेत्रात पदार्पण केले. या नाटकांतील भूमिकांना रसिकांनी उचलून धरल्याने एकापाठोपाठ एका नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळत गेली अन् ती तितक्याच ताकतीने निभावलीही. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तिच्या नाटकांचे प्रयोग झाले आहेत. ‘गावकथा’ या नाटकाचे सध्या राज्यभर प्रयोग सुरू आहेत. यामध्ये रश्मीने लहान मुलगी, तरुणी, पौढ महिला अन् आजीबाईची भूमिका साकारली आहेत. या नाटकाचा प्रयोग डिसेंबरमध्ये साताºयात होणार आहे. भूमिका साकारत असतानाच रश्मीने दिग्दर्शन, लेखन क्षेत्रही अनुभवले. घरटे जिव्हाळ्याचे या नाटकाचे तिने दिग्दर्शन केले. एका शेवटाची सुरुवात या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले. तसेच वुई दि ह्यूमन, बियाँड दि मार्इंड, मिसटाईम या मराठी मुनिया, बाड या हिंदी शॉर्टफिल्ममध्ये काम केले आहे. तसेच २०१२ मध्ये सातारा शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. नाट्य क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी महिला पुरस्कार, शिवजीत कलारत्न पुरस्कार , हिरकणी पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला आहे.या नाटकांतून भूमिकासौजन्याची ऐशी तैशी, नाथ हा माझा, यंदा कर्तव्य आहे, गोची झाली ना, लवंगी मिरची कोल्हापूरची, विच्छा माझी पुरी करा, गर्जले सह्याद्र्रीचे कडे, द आय व्हिटनेस, गावकथा, घरटे जिव्हाळ्याचे (दिग्दर्शन), एका शेवटाची सुरुवात (लेखन आणि दिग्दर्शन) एकांकिका करायला गेलो एक (अभिनय व दिग्दर्शन), दैव ज्यात दु:खे भरता (दिग्दर्शन), अमावास्येचा चंद्र, रोज मरे त्याला, रिक्षावाला, त्यांच्या मानगुटीवर, म्युटेशन (दिग्दर्शन), माज्या साडेसहा रुपयांचे काय केलेस?.
‘गावकथा’तून रश्मी साकारतेय चार भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:09 PM