सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे.
जिल्ह्यामध्ये रास्त भाव दुकानांची संख्या वाढणार असल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.
नवीन वर्षामध्ये स्थानिक जनतेला आता लांब प्रवास करून अथवा चालत जाऊन रेशन आणावे लागणार नाही तर आपल्या जवळच्या अंतरावरील दुकानातून धान्य मिळणार असल्याने ओझे वागवण्याचा त्रासदेखील कमी होणार आहे.
१) जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने - १६८१ शहरी भाग - ५०७ ग्रामीण भाग - ११७४
२) कोठे किती वाढणार? जावली १४ कराड १८ खंडाळा १४ खटाव १४ कोरेगाव ३० महाबळेश्वर ४९ माण ५
पाटण ७४ फलटण ९
सातारा ३१ वाई २८
३) लाभार्थ्यांची गैरसोय दूर होणार
रास्त भाव दुकानांची संख्या आता वाढणार असल्यामुळे लाभार्थ्यांची सोय होणार आहे. धान्य घेण्यासाठी लांबचा पल्ला पार पाडावा लागत होता. आता जवळ दुकान होणार असल्याने त्यांचा त्रास कमी होणार आहे.
कोट
शहरी भागात नवीन रास्त भाव दुकान मंजुरीचे अनुषंगाने शासनाने दिलेली स्थगिती दि. १९ सप्टेंबर रोजीच्या पत्राने उठवली असून त्या अनुषंगाने शहरी भागात रास्त भाव दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करून अंतिम कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे.
- स्नेहा किसवे देवकाते
जिल्हा पुरवठा अधिकारी