लॉकडाऊन काळात रेशनचे धान्य गोरगरीब जनतेला मोठा आधार ठरले आहे. राज्य शासनाकडून प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिला जात आहे, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकुटुंब २५ किलो गहू व १० किलो तांदूळ दिला जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ दिले जात आहे. तालुक्यात तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. रेशन धान्य दुकानातून गावपातळीवर याचे वाटपही सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाकडून हे धान्य दिले जात आहे. या रेशन धान्याचा गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळाला आहे. अन्न सुरक्षा योजनेतील पिवळ्या व केसरी शिधापत्रिका धारकांना हे धान्य दिले जात आहे. म्हणजे ज्यांना प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरात रेशनिंग धान्य मिळते, त्याच कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ दिला जात आहे. कऱ्हाड तालुक्यात ७८ हजार लाथार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
लॉकडाऊनमध्ये रेशनिंग धान्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:38 AM