कऱ्हाड : रयत सहकारी साखर कारखाना हा शासनाच्या परवानगीने व मान्यतेने कुमुदा शुगर अॅन्ड अॅग्रो प्रोडक्टस् लि. यांना १९ सप्टेंबर २०१३ रोजी चालविण्यास देण्यात आला आहे. जवळपास अठरा वर्षांचा हा करार आहे. त्यामुळे रयत कारखान्याने एफआरपीनुसार दर दिला नसल्याची माहिती पूर्णत: चुकीची असून ‘रयत’चा ‘कुमुदा’शी कसलाही संबंध नाही, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जयसिंंगराव पाटील व अशोकराव थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली. थोरात म्हणाले, यापूर्वी तीन वर्षे कोल्हापूरच्या शाहू कारखान्याशी रयतने करार केला होता. महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने १९६० चे कलम २० अ या सहकार कायद्यानुसार २०१३-१४ या गळीत हंगामापासून ‘कुमुदा’ला २०१३ पासून त्यांच्याबरोबर साखर आयुक्त यांच्यासमोर झालेल्या करारान्वये १८ वर्षांसाठी सहयोग तत्त्वावर चालविण्यास देण्यात आला आहे. त्यामुळे या करारानुसार कराराच्या कालावधीत उसाच्या पेमेंटसहित सर्व दैनंदिन कामकाजाची व व्यवहाराची पूर्णपणे जबाबदारी ही कुमुदा शुगरची आहे. या व्यवहाराबाबत रयत साखर कारखाना कुठल्याही प्रकारे जबाबदार नाही. रयत कारखाना कुमुदा शुगर हे चालवित असल्याने कामकाजाबाबतच्या प्रसिद्ध होणाऱ्या माहितीमध्ये रयतच्या नावाने चर्चा करणे चुकीचे आहे. (प्रतिनिधी)नो कॉमेन्टस्‘तुम्हाला रयत सहकारी साखर कारखाना चालवायला जमले नाही. म्हणून तुम्ही कुमुदा शुगर या प्रायव्हेट कंपनीला कारखाना चालवायला दिला आहे का,’ असे पत्रकारांनी छेडले असता अशोकराव थोरात यांनी याला ‘नो कॉमेन्टस्’ एवढेच उत्तर दिले. शेतकरी आता कुमुदालाच ऊस घालतो‘तुम्ही जरी कारखाना चालवायला दिला असला तरी शेतकरी अजूनही रयत या नावावर विश्वास ठेवून ऊस घालतो. त्यामुळे तुमची नैतिक जबाबदारी आहेच ना,’ असे विचारले असता शेतकरी आता कुमुदाला ऊस घालतो, रयतला नव्हे, असे अशोकराव थोरात यांनी सांगितले.
‘रयत’चा ‘कुमुदा’शी संबंध नाही : पाटील
By admin | Published: November 18, 2014 9:08 PM