मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांना रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे आणि शेतकऱ्यांनी दिले. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, शामगावचे प्रल्हाद पाटील, युवराज पोळ, पार्लेचे सुभाष नलवडे, टेंभूचे नागराज शिंदे, अशोक जाधव, शंकर अकतारे, अनिल डुबल, अजित पाटील, सुरेश खोचरे, वसंतराव धोकटे, ज्ञानदेव नलवडे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यासह ट्रान्सफॉर्मर बंद करून वीज बिलाच्या वसुलीचा तगादा लावला जात आहे. शेतकरी लॉकडाऊन आणि अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे बिले भरण्यास सक्षम नाही. जिल्ह्यात सध्या एकाही साखर कारखान्याने उसाची एफआरपी शेतकऱ्यांना दिलेली नाही. सरकार यावर कोणतीही कार्यवाही करत नाही. शेतकऱ्यांची वीज बिले थकली म्हणून कनेक्शन तोडली जात आहेत. शासनाने अगोदर साखर कारखान्यावर कारवाई करावी आणि मगच विजेच्या बिलाची वसुली करावी.
सध्या उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सरकार व महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन येणाऱ्या काळात करेल. त्याची सर्व जबाबदारी सरकार आणि महावितरणची असेल. या निवेदनावर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
फोटो : २५केआरडी०३
कॅप्शन : ओगलेवाडी, ता. कऱ्हाड येथे वीज कार्यालयावर पोहोचलेल्या रयत क्रांतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता अभिमन्यु राख यांना निवेदन दिले.