यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संवाद प्रसंगी वक्तव्यंलोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सध्या मी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडविण्यात मला आनंद आहे. मात्र, पक्षाच्या अध्यक्षांनी साताºयाचे तिकीट दिले तर मी प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे,’ असा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. मात्र, दोनच मिनिटांनी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घूमजाव करत मी बारामतीच खूष असून २०१९ ची निवडणूकही तेथूनच लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचे लोकसभेत प्रतिनिधित्व करण्यास अभिमान आहे. राज्याने स्वच्छता अभियान, रोजगार हमी योजना व महिला आरक्षणसारख्या योजनांची सुरुवात केली. मात्र, गेल्या तीन वर्षांत राज्यात सर्वत्र अस्वस्थ वातावरण आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांचे निकाल, शिष्यवृती आदी गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयीन मुलींची छेडछाड आणि त्यांच्यावर होणाºया अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोपर्डीच्या पीडितेला एका वर्षात न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी दिले होते. या घटनेला एक वर्ष झाले तरी अद्याप तिला न्याय मिळाला नाही. १ जानेवारीपर्यंत सरकारने या घटनेतील आरोपींना शिक्षा सुनावली नाही तर मी सुप्रिया सुळे स्वत: रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. अत्याचार हा राजकीय प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे. याप्रश्नी सर्वांनी संवेदनशील होऊन आवाज उठवला पाहिजे.शेतकºयांची कर्जमाफी म्हणजे जणू शासनाचा सावळा गोंधळ सुरू आहे. आॅनलाईनमुळे अनेकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्याचबरोबर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. या सर्व ज्वलंत प्रश्नांसाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.