तरडगाव : पती निधनाच्या पश्चात शेतात राबून मुलाच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाºया मातेच्या पाठीशी आता अख्खा गाव उभा राहिला आहे. फलटणच्या आमदारांनी मुलाच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली तर तरडगावकरांनी रोहिणी अडसूळ या मातेला मुलाच्या शिक्षणासाठी तब्बल २५ हजार रूपयांची मदत केली आहे. घरातील कर्त्या पुरुषावर कुटुंबाची जबाबदारी असतानाच ते अर्ध्यावरच संसाराचा डाव सोडून गेल्यावर तरडगाव, ता. फलटण येथील अडसूळ कुटुंबाची वाताहत झाली. तरीही रोहिणी अडसूळ यांनी मुलगा रोहन याच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. त्याची आता जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाल्याने रोहिणी यांना त्यांच्या कष्टाचे चिज झाल्याचे वाटत आहे. त्यांची मुलगी प्रितीही नियमीत शाळेत जात आहे. घरापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर व तसं पाहिलं तर धोकादायक लोणंद-फलटण रस्त्याच्याकडेला असणाºया चाळशी मळा येथील शाळेत त्या आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी सायकलवरून सोडून पुन्हा घरी आणत असत. दरम्यान, दिवसभर दुसºयाच्या रानात मोलमजुरी करुन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या. यातूनच त्या प्राथमिक गरजा व मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कमवू लागल्या. आता मुलाच्या यशानंतर या मातेला आर्थिक हातभार देण्याच्या उद्देशाने तरडगाव ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी मदत केली आहे. रोहनच्या आईने मुलांसाठी घेतलेले कष्ट इतर सर्वसामान्य कुटुंबातील महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. खडतर परिस्थितीत रोहन याने मिळविलेले यश अलौकिक असून बारावीनंतर त्याच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी आम्ही काही लोक स्वीकारणार आहे.- दीपक चव्हाण, आमदार |
कष्टकरी मातेला मुलाच्या यशाची पावती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:58 PM
तरडगाव : पती निधनाच्या पश्चात शेतात राबून मुलाच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाºया मातेच्या पाठीशी आता अख्खा गाव उभा राहिला आहे. फलटणच्या आमदारांनी मुलाच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली तर तरडगावकरांनी रोहिणी अडसूळ या मातेला मुलाच्या शिक्षणासाठी तब्बल २५ हजार रूपयांची मदत केली आहे.
ठळक मुद्देमुलगा रोहनच्या शिक्षणासाठी घेतले कष्ट दिवसभर दुसºयाच्या रानात मोलमजुरीदोन्ही मुलांना शिक्षणासाठी सायकलवरून सोडून पुन्हा घरी आणतमातेला आर्थिक हातभार देण्याच्या उद्देशाने तरडगाव ग्रामस्थ एकत्र