कऱ्हाड : वारुंजी, ता. कऱ्हाड येथील ५४ वर्षांपासून प्रलंबित असणारा गावठाणचा प्रश्न पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला आहे. उपसरपंच अनुज पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
वारुंजीचे उपसरपंच मनोज पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी सदस्य संभाजी चव्हाण, राहुल पवार, अशोक पाटील, इम्तियाज नदाफ, महेश पाटील, जीतू पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी ७ मार्च २०१९ रोजी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन गावठाणाबाबत अंतिम अधिसूचना होऊन गावठाण मंजूर व्हावे, असे निवेदन दिले होते. उपसरपंच अनुज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही या प्रश्नी लक्ष घालून आवश्यक ती पूर्तता करून गावठाणास मान्यता देण्याबाबत प्रयत्न केले. त्यामुळे अखेर वारुंजी गावठाणाला मान्यता मिळाली.
दरम्यान, गावठाणाला मान्यता मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कौतुकाचा ठराव घेण्यात आला. तसेच निवासस्थानी जाऊन त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कारही करण्यात आला. सरपंच शकुंतला पवार, उपसरपंच अनुज पाटील, सदस्य संभाजी चव्हाण, प्रशांत पाटील, राहुल पवार, अशोक पाटील, इम्तियाज नदाफ, पांडुरंग गुरव, सोहेल नदाफ, बाबासाहेब भोसले उपस्थित होते.
फोटो : ०५केआरडी०२
कॅप्शन : वारुंजी, ता. कऱ्हाड गावठाणाला मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला.