शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

Satara: कोयनेतून सिंचनासाठी विक्रमी पाण्याचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 11:58 AM

पावसाने ओढ दिल्याने स्थिती : यंदा पंधरा टीएमसीने धरणाच्या पाणीसाठ्याची तूट निर्माण

कोयनानगर : कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. धरणाच्या उभारणीपासून हा विक्रमी विसर्ग असू शकतो. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे असून, १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या कोयना धरणामध्ये चालू जलवर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही, यामुळे सुमारे पंधरा टीएमसीने धरणाच्या पाणीसाठ्याची तूट निर्माण झाली होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच पाणीकपातीची टांगती तलवारीची चर्चा होती.सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार शेती पिण्याच्या पाणीसाठी धरणाच्या पूर्वेकडे ऑक्टोबर महिन्यापासूनच पाण्याचा विसर्ग सुरू झाला, तो अपवाद वगळता आजवर कायम सुरू आहे. याचाच परिणाम की काय पाणी वापराची अधिक मर्यादा वीजनिर्मितीवर दिसून आली. सुरुवातीला काटकसरीने व नंतर गरजेप्रमाणे कोयना जलविद्युत प्रकल्पाने वीजनिर्मिती सुरू ठेवली असली तरी तुलनेने कमी वीजनिर्मिती झाल्याने तांत्रिक वर्षातील वीज उत्पन्न ही घटवणारी आहे. मागील दोन वर्षे लवादाच्या निर्धारित ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापेक्षा अनुक्रमे ८२ व ७१ टीएमसी असा अतिरिक्त पाण्याचा वापर करून कोयना प्रकल्पाने संकटकाळी वीजनिर्मिती करून मोठा हातभार लावला होता. तांत्रिक वर्षाचे काही तास शिल्लक असताना पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी ५७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे लवादाने आरक्षित केलेली ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याचा पूर्ण वापर होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातील इतर वीजनिर्मिती प्रकल्पांपेक्षा जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती कमी खर्चात होत असली तरी चालूवर्षी वीजनिर्मितीस बगल देत पूर्वेकडील भागाला विक्रमी ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग केल्याने सिंचनासाठी प्राधान्य दिल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांत सिंचनासाठी पाण्याची वाढती मागणी पाहता भविष्यातही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

सिंचन विभागकडून सुरुवातीपासून पाण्याचा काटकसरीने वापराचा आदेश होता, तसेच वीजनिर्मितीचा ८.५० टीएमसी पाण्याचा कोटा कमी केल्याने आरक्षित पाणीसाठा वापरला जाणार नाही. तरीही ऐन उन्हाळ्यात मागणीप्रमाणे पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. -एस. जी. चोपडे, मुख्य अभियंता, महाजनको, पोफळी

मागील चौदा वर्षांत सिंचनासाठी पाण्याचा विसर्गसन २००९-१० पाण्याचा विसर्ग -१७.३९ टीएमसी२०१०-११ - १४.४० टीएमसी२०११-१२ - २१.४२ टीएमसी२०१२-१३ - २८.४२ टीएमसी२०१३-१४- २२.९६ टीएमसी२०१४-१५ - २१.९५ टीएमसी२०१५-१६ - ३७.२४ टीएमसी२०१६-१७ - ३५.७२ टीएमसी२०१७-१८ - २९.८९ टीएमसी२०१८-१९ - ३९.३७ टीएमसी२०१९-२० - २६.८२ टीएमसी२०२०-२१ - ३५.१५ टीएमसी२०२१-२२ - २२.९१ टीएमसी२०२२-२३ - ४०.७६ टीएमसीदि ३१ मे रोजी सकाळी ४५.१९ टीएमसी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी