शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
2
भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
3
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
4
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
6
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
8
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
9
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Election Result 2024: ठाकरे गटाच्या गटांगळ्या! ठाणे-कोकणच्या गडाला खिंडार, शिंदेसेनेपुढे जिंकला फक्त एक आमदार
12
Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय
13
Maharashtra Assembly Election Result 2024: दहिसरमध्ये मनीषा चौधरी यांची हॅटट्रिक; शिवसेना उबाठा गटाच्या घोसाळकर यांचा दारूण पराभव 
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले"; विजयानंतर अजित पवारांचा टोला
15
नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
16
'ओ स्त्री! रक्षा करना', राजकारणातील सर्वाधिक पावरफुल मंत्र ठरला; एकामागोमाग एक सरकारे वाचली
17
Maharashtra Assembly Election Result 2024: मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्याकडून आशिष शेलारांच्या भावाचा पराभव; सलग चौथ्यांदा विजय
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महायुतीचा मुख्यमंत्री कोण?; खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच दिलं सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
19
Yevla Vidhan Sabha Election Result 2024 Live : छगन भुजबळांनी येवल्याचा गड राखला; २६०५८ मतांनी विजयी, शिंदे पराभूत 
20
Maharashtra Assembly Election Result 2024: वर्सोव्यात शिवसेना उबाठाच्या हारुन खान यांचा विजय, भाजपच्या भारती लव्हेकरांचा १६०० मतांनी पराभव

रयत शिक्षण संस्थेत नोकरभरती घोटाळा; दोन माजी सचिवांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 3:21 AM

शरद पवारांनी घेतली तातडीने बैठक

सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा झाला आहे. याबाबत तक्रारी झाल्यानंतर संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. याबाबत राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली होती.रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशा तक्रारी यापूर्वीही अनेकदा झाल्या आहेत. मात्र, कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत असा दावा या संस्थेचे पदाधिकारी करत होते. पैसे दिले नाहीत म्हणून अनेकांना पंधरा वर्ष नोकरीत कायम करण्यात आले नव्हते. मात्र, ज्यांनी पैसे दिले, त्यांची ताबडतोब ऑर्डर काढण्यात आली. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक जणांना केवळ तासिका तत्त्वावर काम करावे लागत होते, अशा तक्रारी आहेत. संस्थेमध्ये सचिव पदावर काम केलेले भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांच्याबाबतही तक्रारी झाल्या होत्या. याबाबतची चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात तातडीने मॅनेजिंग कौन्सिलची बैठक घेतली. पैसे तातडीने परत करण्याच्या सूचना चुकीच्या पद्धतीने नोकर भरती करणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत दिला. ज्यांच्याकडून पैसे घेण्यात आले, त्या सर्वांना पैसे परत देण्याच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या आहेत. तक्रारींचे निरसण होईपर्यंत संस्थेकडून कराळे व बुरुंगले यांना कोणतेही देणे दिले जाऊ नये, असेही ठरल्याचे समजते. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार