शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट; मुसळधारचा इशारा, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

By नितीन काळेल | Updated: July 8, 2024 19:31 IST

विशेष करुन जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाट क्षेत्रात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस वाढत असून हवामान विभागाने ९ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस सुरू आहे. सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८८६ मिलीमीटर पाऊस होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३११ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे. तरीही अजुन पश्चिम भागात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतही कमी पाणीसाठा आहे. अशातच हवामान विभागाने दि. ८ आणि ९ जुलै रोजी सातारा जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिलेला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. विशेषता करुन जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाट क्षेत्रात पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनानेही नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.पश्चिम भागात दरडी कोसळतात, झाडे पडतात. त्यामुळे दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नये, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

प्रशासनाने असेही केले आवाहन..

  • नदीनाल्यावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
  • पर्यटनस्थळे, धबधबे, धरण परिसर, घाटमाथा आदी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जायचे टाळावे.
  • पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय आणि मोबाईलचा वापर करू नका.
  • प्रवास करताना घाट रस्त्यात विनाकारण थांबू नये.
  • अफवांवर विश्वास आणि अफवाही पसरवूही नका.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस