सातारा : ‘शिवगान स्पर्धेमुळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आचार विचार, त्यांचे आचरण, सर्वधर्मियांना बरोबर घेऊन कार्य करण्याची पद्धत, शेतकऱ्याची काळजी व शेतीसंबंधी योगदान, अशा विविध गुणांचा प्रसार तरुण पिढी आणि समाजात होण्यास मदत होणार आहे,’ असे मत राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी व्यक्त केले.
खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शिवगान स्पर्धेचे बक्षीस वितरण कल्पनाराजे भोसले यांच्याहस्ते घेण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या स्पर्धेतील एक अंध स्पर्धक पियुशा भोसले हिचे जवळ घेऊन कौतुक केले.
या स्पर्धेला संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, वेगवेगळ्या सर्व तालुक्यांतून काही संघ तसेच शाळादेखील सहभागी झाल्या होत्या. यावेळी समूहगान स्पर्धेसाठी तब्बल सांघिक २८ संघ व वैयक्तिकसाठी ४२ इतके स्पर्धक उपस्थित होते. त्यातून वैयक्तिक गटात प्रसन्न रुईकर, प्राजक्ता महामुनी, शर्वरी काशिद व पियुशा भोसले यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ तसेच सांघिक गटात म्युझिक वॉरियर ग्रुप, पाटण, न्यू इंग्लिश स्कूल, सातारा, श्रीराज बर्गे व स्वराली बर्गे तसेच अण्णासाहेब कल्याणी विद्यालय यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
महाराष्ट्र भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण म्हणाले की, आज परमपुज्य भारत मुनी यांच्या जयंतीदिवशी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हास्तरीय प्राथमिक फेरीचे ४८ ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास १५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जवळपास तीन ते साडेतीन लाख लोकांनी या स्पर्धेचा लाभ घेतला. या स्पर्धेमुळे स्पर्धक व शिवसमर्थक जनतेमध्ये उत्साह आहे.
अमोल सणस, दीपक क्षीरसागर, नीलेश शहा, सुनीशा शहा (या नावांचा संदर्भ लागत नाही)
यावेळी भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशसह संयोजन पंकज चव्हाण, विकास बनकर, दीपाली आंबेकर, सातारा भाजप शहर अध्यक्ष विकास गोसावी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी अनिताताई घोरपडे, राजूशेठ राजपुरोहित, भरतनाना पाटील, स्वाती पाटील, विजय काटवटे, शैलेंद्र कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा भिसे यानी केले. या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक शिरीष चिटणीस, महिला अध्यक्ष वैशालीताई राजेघाटगे, शहराध्यक्ष कैलास मोहिते, अभिमन्यू तांबे, अतुल पाटोळे, आदित्य शेंडे, अजिंक्य लकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिवगान स्पर्धेची अंतिम फेरी राजधानी सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
फोटो ओळ : सातारा येथील जिल्हा बँकेच्या सभागृहात भाजपतर्फे आयोजित शिवगान स्पर्धेचे बक्षीस वितरण कल्पनाराजे भोसले यांच्याहस्ते झाले.
फोटो नेम : १०बीजेपी