मल्हारपेठ : ‘राजकारण व समाजकारण करताना मी पणा चालत नाही. मीच म्हणजे अमुक, मी हे करून शकतो ते करू शकतो. माझ्यामुळेच होते. असा मी पणा बरोबर नसून बिनापक्षाने माणूस जास्त दिवस टिकत नाही. ज्याच्यामागे पक्ष उभा राहतो तो मोठा होतो. समोरच्याला चारी मुंड्या चित करून येथील परंपरा मोडीत काढा,’ असे मत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. मल्हारपेठ जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार हर्षद कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, युवा सेना तालुकाध्यक्ष ओमकार बस्मे, उपतालुका प्रमुख सुरेश पाटील, विभाग प्रमुख संपत कोळेकर, राहुल पवार, संजय पवार व पुरस्कृत उमेदवार किरण नलवडे व निशाताई शिंंदे आदी उपस्थित होते.मंत्री रावते म्हणाले, ‘जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या संबंधित निवडणूक आहे. कुणाचेही मतदार असा; पण नवीन सुरुवात करणाऱ्या उमेदवाराला निवडून देणे अगत्याचे आहे. जन्मापासून शेवटपर्यंत पंचायत समिती व जिल्हा परिषदेचा संबंध येतो. त्या सर्वसामान्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक लहान-मोठ्या गरजा या भागविणे हे सदस्यांचे कर्तव्य आहे. मोदींनी जनतेला नोटाबंदी करून नाहक त्रास दिला त्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिला आवाज उठवून विरोध केला. ‘धनुष्य’ सर्वसामान्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवित राहील.’या कार्यक्रमास विहे, उरुल, मल्हारपेठ, नवारस्ता, मोरगिरी भागातील शिवसैनिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. दादा पानस्कर यांनी आभार मानले. (वार्ताहर)भूलथापांना जनता कदापि बळी पडणार नाही : कदमहर्षद कदम म्हणाले, ‘शिवसैनिक कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जनत सुज्ञ असून विरोधकांच्या खोट्या भुलथापांना बळी जाणार नाही. अनेकांना आजही घरकुले व कामे नाहीत. या विभागात आपल्याला शिवसेनेची बांधिलकी निर्माण करावयाची आहे.’
परंपरा मोडीत काढा
By admin | Published: February 17, 2017 11:01 PM