औंध : गोपूज येथील जिल्हा परिषद शाळेतील हातपंप गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद अवस्थेत होता. त्यामुळे शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांसह त्यावर अवलंबून असणाऱ्या आजुबाजूच्या वस्तीचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून गुरुवारी या हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे लोकांतून समाधान व्यक्त होत आहे.
सरपंच सरिता घार्गे, उपसरपंच संतोष कमाने, ग्रामसेवक सुनील राजगुरू यांच्यासह सदस्यांनी पाठपुरावा करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हातपंपाची दुरुस्ती करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याचे फलित म्हणून गुरुवारी तत्काळ हातपंप दुरुस्त करण्यात आला. यावेळी चंद्रकांत घार्गे, उपसरपंच संतोष कमाने, पृथ्वीराज घार्गे, रामदास घार्गे, सचिन घार्गे, मुख्याध्यापक दिलीप जाधव, मंगेश घार्गे, शिवाजी चव्हाण, पोपट शिंदे, रोशन कमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा हातपंप कार्यान्वित झाल्यामुळे एसटी स्टँड परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे तसेच वाटसरूंचीही तहान भागेल, असा विश्वास चंद्रकांत घार्गे यांनी व्यक्त केला.
०६औंध
फोटो:
गोपूज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठ वर्षांपासून बंद असलेला हातपंप दुरुस्त करण्यात आला. यावेळी चंद्रकांत घार्गे, संतोष कमाने, पृथ्वीराज घार्गे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
(छाया : रशिद शेख)