निलेश साळुंखेकोयनानगर : कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाच्या विद्युतवाहिनीच्या नियोजित कामामुळे आज, शनिवारी (दि.१०) सकाळी धरणाचा पायथा वीजगृह पूर्ण बंद करण्यात आला. पूर्वेकडील सिंचनासाठी धरणाच्या एका वक्री दरवाजातून ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.कोयना धरणाच्या पायथावीगृहातून निर्माण झालेली वीज विद्युत वाहिनीद्वारे वहन करण्यात येत असते, याच वाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारपासून दहा दिवस चालणार असल्याने शनिवार सकाळी दहा वाजता धरणाच्या पायथावीजगृहातून पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे. धरणाच्या पूर्वेकडील कृष्णा कोयना नदीवर अवलंबून असलेल्या सिंचन व पिण्याच्या पाण्याची मागणी असल्याने धरण्याच्या सहावक्री दरवाजांपैकी एक दरवाजा शनिवारी दुपारी दोन वाजता उघडून कोयना नदीपात्रात ११०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दि. १७ ऑक्टोबर रोजी बंद केलेले वक्रीदरवाजे शनिवारी पुन्हा उघडण्यात आले आहे. सध्या धरणात ९५.२६ टीएमसी इतका पाणीसाठा असून, धरणाची पाणीपातळी २१५५.०९ फूट इतकी आहे १०५ टीएमसी इतका पाणीसाठा क्षमता असलेल्या कोयना धरणात सध्या ९०.५१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
कोयना धरणाच्या विद्युतवाहिनीची दुरुस्ती, 'इतके' दिवस पायथा वीजगृह बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 7:27 PM