लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : केंद्र शासनाने शेतकºयांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पध्दतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द होईपर्यंत आरपारची लढाई सुरूच राहणार आहे,’ असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच रविवारी सातारा शहरातून रॅली काढण्यात आली.
याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कोरोना विषाणूच्या नावाखाली लॉकडाऊन काळात शेतकºयांच्या विरोधात कृषी विषयक तीन कायदे केलेले आहेत. या कायद्यामुळे शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विविध उत्पादनांसाठी मिळणारा हमीभाव तसेच शेतकरी हिताच्या अनेक बाबींवर अप्रत्यक्षरित्या गंभीर परिणाम होणार आहे. या कायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणारा शेती व्यवसाय व शेतकरी हळूहळू उध्दवस्त होणार आहे. हे अन्यायकारक कायदे केंद्राने मागे घ्यावेत यासाठी जवळपास ५० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत हाल, उपासमार सोसत धरणे आंदोलन करत आहेत. तरीही केंद्र शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा स्थितीत शेती व्यवसायाशी निगडीत प्रत्येकाने शेतकºयाच्या पाठिशी राहणे आवश्यक आहे. या गोष्टीची जाणीव ठेवूनच राष्ट्रीय किसान मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी व आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते.
दि. ११ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन १६ रोजी संपले. त्यामुळे रविवारी सातारा शहरातून रॅली काढून कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली, असे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
या रॅलीत राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बोराटे, प्रा. डॉ. ए. जी. होवळ, रफिक मुलाणी, विजय काटरे, अमृत सूर्यवंशी, प्रकाश काशीळकर, सुमीत डांगे, आदेश शिंदे, सौरभ खरात, अशफाक शेख, तेजस माने, विनोद लादे, किशोर थोरवडे, कुमोद खरात, हंबीरराव बाबर, अॅड. विक्रांत संघमित्र, मयूर थोरवडे, रोहित संकपाळ, एम. ए. आढाव, सोनाली नितनवरे, संध्या शिर्के, लता बनसोडे आदींसह इतर काहीजण सहभागी झाले होते.
फोटो दि.१७सातारा राष्ट्रीय किसान मोर्चा फोटो...
फोटो ओळ : सातारा शहरात रविवारी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने रॅली काढण्यात आली.
.................................................