शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘तारळी’बाबत अहवाल सादर करावा

By admin | Published: February 01, 2015 9:03 PM

विजय शिवतारे : प्रकल्पास भेट; शेतकऱ्यांनी दिले निवेदन

तारळे : ‘तारळी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तसेच छोट्या उपसा जलसिंचन योजना राबविण्याबाबत पथदर्शी अहवाल सादर करावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिल्या. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पाटण तालुक्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार शंभूराज देसाई, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, प्रांताधिकारी संजीव जाधव, कऱ्हाडचे प्रांताधिकारी किशोर पवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, तहसीलदार रवींद्र सबनीस, कऱ्हाडचे तहसीलदार सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.तारळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन यावेळी पालकमंत्र्यांना सादर केले. या निवेदनाबाबत चर्चा करून पालकमंत्री म्हणाले, ‘प्रत्यक्ष पाहणी करून लोकांशी संवाद साधल्यानंतर प्रश्न सुटतात. या भावनेने मी आज येथे आलो आहे. ऐतिहासिक, धोरणात्मक काम घडावे, असा माझा मनोदय आहे. त्या उद्देशानेच हा पाहणी दौरा आहे. पाचशे कोटींची योजना करण्यापेक्षा शंभर कोटींच्या पाच योजना करण्याबाबत आपला विचार आहे. छोट्याछोट्या उपसा जलसिंचन योजना करून त्याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना करून देता येईल. त्या दृष्टीने माझे प्रयत्न असणार आहेत. छोटेछोटे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी हयगय न करता पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत प्राधान्य द्या. काही बाबींमध्ये धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. खऱ्या बाधित शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. पुनर्वसनाचे प्रश्न तसेच पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करावे, व याबाबतचा सखोल अहवाल मला सादर करावा. यातून निश्चितपणे मार्ग काढेन,’ असेही ते म्हणाले.आमदार शंभूराज देसाई म्हणाले, ‘शेतकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री प्रत्यक्ष जाग्यावर आले आहेत. तारळी धरणाचे पाणी प्रथम पाटण तालुक्यात देण्याची मागणी सुरुवातीपासूनच मी करत आहे. एक्सप्रेस कॅनॉलने या धरणाचे पाणी माण, खटाव तसेच टेंभूलाही जाणार आहे. पालकमंत्री निश्चितपणे प्रश्न सोडवतील,’ असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी परिसरातील ग्रामस्थ, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)