सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था संपेपर्यंत या रस्त्यावरील पथकर आकारू नये, असे निवेदन सातारकरांच्या वतीने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना आनेवाडी टोल नाक्यावर देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, 'सातारा - पुणे या प्रवासाच्या वेळेत वाढ होण्याबरोबरच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे.
या रस्त्यावरून प्रवास करताना सोयीसुविधांच्या अभावामुळे होणारी गैरसोय, जीवित व वित्त हानी, मानसिक त्रास लक्षात घेता टोल का भरावा असा समस्त सातारा जिल्हावासियांना प्रश्न पडला आहे.
जोपर्यंत सुविधा उपलब्ध होत नाहीत तोवर टोलमुक्ती करण्याचे ही यात नमूद केले आहे.' यावेळी रवींद्र नलवडे, महारुद्र तिकुंडे, महेश पवार, नितीन काटे, महेश महामुनी उपस्थित होते.