मसूर : ‘या विभागाचा जिव्हाळ्याचा व अनेक वर्षांपासून खितपत असलेला धनगरवाडी-हणबरवाडी योजनेचा पहिला टप्पा येत्या दोन ते अडीच महिन्यांत पूर्ण होऊन यातून २५० हेक्टरला पाणी मिळेल. तसेच कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता शुक्रवारपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार आहे,’ अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.मसूर येथे ग्रामसचिवालय इमारत, विकास सोसायटी इमारत, बंदिस्त गटारकाम, रस्ते अशा विविध विकास कामांच्या भूमिपूजन व कºहाड उत्तर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते.
मराठा समाजाला लवकरच आरक्षण: चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:01 PM