कातरखटाव : बोंबाळे ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्मा इंगवले, तर उपसरपंचपदी बालाजी निंबाळकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर कार्यकर्त्यांनी भैरवनाथ मंदिरात गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.
गेली पंचवार्षिक निवडणूक बोंबाळे गावाने बिनविरोध जाहीर केली होती. परंतु आता निवडणूक लढवावी लागल्याने ग्रामपंचायतीच्या नऊ जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत चुरशीची दुरंगी लढत झाली. यात आनंदराव घोरपडे, अशोक निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, रामहरी निंबाळकर, राजू पाटील यांचे महाविकास विकास आघाडी पॅनेल विजय झाले.
त्यानुसार सरपंचपदी रेश्मा इंगवले व उपसरपंचपदी बालाजी निंबाळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रतिभा भराडे, पोलीस पाटील अर्चना हजारे, ग्रामसेवक यु. बी. शिंदे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व गणेश निंबाळकर, रमेश जाधव, संगीता निंबाळकर, रूपाली दुबळे या सर्व सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
फोटो ०५बोंबाळे
बोंबाळे ता. खटाव ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच रेश्मा इंगवले, उपसरपंच बालाजी निंबाळकर व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला (छाया : विठ्ठल नलवडे )