शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी
2
PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट
3
गुलाबराव पाटलांनी 'टायमिंग' साधलं; राष्ट्रवादी प्रवेशाच्या तयारीत असलेल्या देवकरांना खिंडीत गाठलं
4
सावधान! Bleeding Eye व्हायरस म्हणजे काय? ८ दिवसांत होतो रुग्णाचा मृत्यू, 'ही' आहेत लक्षणं
5
“बाबासाहेब आंबेडकर, संविधानाचा अवमान, विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा”: नाना पटोले
6
नागा-शोभितानंतर आता साउथच्या या अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
7
खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल
8
"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी
9
'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा
10
हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...
11
अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान
12
"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
13
मार्गशीर्ष पौर्णिमा: अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी ‘ही’ ३ कामे अवश्य करा; भरभराट होईल!
14
डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS
15
Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा
16
शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!
17
BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी
18
Ajit Pawar :- वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान
19
आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO)
20
आईची हत्या, ६ दिवस मृतदेह घरात, वडील येताच...; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का

Satara: कोळेवाडी ग्रामसभेत मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 1:14 PM

कऱ्हाड (जि. सातारा ) : इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा ...

कऱ्हाड (जि. सातारा) : इलेक्ट्रानिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर होणारे मतदान संशयास्पद असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका ईव्हीएम नव्हे, तर मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घ्यावे, या मागणीचा ठराव कोळेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या करण्यात आला.कोळेवाडी (ता. कऱ्हाड) येथे सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतलेल्या ठरावाची प्रत प्रसिद्धीसाठी दिली आहे. यावेळी ग्रामस्थ म्हणाले, भारतात संसदीय लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणूक आणि मतदान प्रक्रिया ही संवैधानिक प्रक्रिया आहे. यापूर्वी मतपत्रिकेवर मतदान घेतले जात होते. त्यावेळी आतासारखा मतदानात संशयकल्लोळ कधीच झाला नाही. सध्याचे मतदान, निकाल व त्यावर संशयास्पद मतमतांतरे अशा अनेक बाबी संशयाच्या घेऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. हे लोकशाहीला मारक आहे. काही वर्षांपासून ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. मात्र, अलीकडेच देशभरात ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात का सापडली आहे. यासाठी खुल्या मनाने व संशयविरहित मतदान निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे. सर्वांचा मतपत्रिकेवर मतदान या प्रक्रियेवर विश्वास आहे. म्हणून भविष्यात वेळखाऊ प्रक्रिया असली तरीही मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी या ठरावाद्वारे आम्ही केली आहे.

विधानसभा निवडणुकीला कोळेवाडीत ईव्हीएम मशीनवर आम्हीही मतदान केले आहे; पण झालेल्या मतदानात कुछ तो गडबड है, असे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे आमचा ईव्हीएमवरील मतदान पद्धतीवर विश्वास नाही. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे, ही आमची मागणी आहे. - वसंत भोसले, माजी सरपंच, कोळेवाडी.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराkarad-south-acकराड दक्षिणEVM Machineईव्हीएम मशीनgram panchayatग्राम पंचायत