मलकापूर शहरातील भाजी मंडई हा विषय अनेक वर्षांपासून वादाचा बनला होता. कायम रस्त्यावर व खासगी जागेतच मंडई भरत होती. या विषयावर विविध संघटना व व्यावसायिकांनी आणि लगतच्या गाळाधारकांनी आंदोलन तसेच उपोषणही केले. नेहमीच तहसीलदार, पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून वारंवार या वादावर पडदा टाकण्याचे काम केले होते. ही बाब विचारात घेऊन नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे व नगरसेवकांनी आरक्षित जागेतील नवीन भाजी मंडई विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला. येथील अहिल्यानगरमधील जागा वाटाघाटीने ताब्यात घेऊन प्राथमिक आराखडा विकसित केला.
तत्कालीन मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह अधिकाऱ्यांनीही तातडीने याठिकाणी प्राथमिक सुविधा देण्यासाठी गतीने हालचाली केल्या. या सर्वांच्या प्रयत्नामुळे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून या नवीन भाजी मंडईचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, महिला व बालकल्याण सभापती स्वाती तुपे, उपसभापती शकुंतला शिंगण, नगरसेवक सागर जाधव, नगरसेविका आनंदी शिंदे, कमल कुराडे, गीतांजली पाटील, नगरसेवक किशोर येडगे, सागर जाधव, जयंत कुराडे, शहाजी पाटील यांच्यासह सर्व शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
- चौकट
मंडईत चाळीस टक्के जागा शेतकऱ्यांसाठी राखीव
अखेर सोमवारी नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्या हस्ते भाजी मंडईचा प्रारंभ झाला. याप्रसंगी दोनशेहून अधिक भाजी विक्रेत्यांनी उपस्थिती लावली होती. मंडईत शेतकऱ्यांसाठी आरक्षित जागा ठेवली असून १०० शेतकरी बसतील, अशी जागा राखीव ठेवली आहे.
फोटो : १६केआरडी०१
कॅप्शन : मलकापुरात भाजी मंडईचा प्रश्न निकाली निघाला असून सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडईचे उद्घाटन करण्यात आले. या मंडईत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आहेत.