सातारा : घनकचºयाच्या माध्यमातून आर्थिक उत्पनाचा स्त्रोत तयार व्हावा, या हेतूने जिल्हा परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आत्तापर्यंत तब्बल २१९ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला आहे. यामध्ये कºहाड तालुक्यातील सर्वाधिक ५५ ग्रामपंचायती आहेत.
स्वत:च्या गावातील कचरा स्वत:च्या गावात मुरवण्यात यावा व त्यातून ग्रामपंचायतीला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत तयार व्हावा, त्याचबरोबर गावांर्तगत स्वच्छता राखली जावी, या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन हा उपक्रम ग्रामपंचायतींना दिशादर्शक असा आहे. या उपक्रमाअंतर्गत गावातील ओला व सुका कचरा ग्रामपंचायत स्तरावर एकत्रित करून खतनिर्मिती केली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत गावचा कचरा कुठेतरी ओढ्याच्या काठी पडत असत. मात्र, या उपक्रमामुळे इतरत्र पडणारा कचरा आता एकत्रित केला जाणार आहे. गावच्या स्वच्छतेबरोबरच रोगराईही कमी होण्यास मदत होणार आहे.
कºहाड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच घनकचरा पायलट प्रोजेक्ट राबविण्यास सुरुवात केली. त्यानंतर बनवडी या ठिकाणी जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हळूहळू हा उपक्रम जिल्हाभर पोहोचला. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी निवडलेल्या गावांमध्ये सर्वाधिक कºहाड तालुक्यातील ५५ ग्रामपंचायती तर द्वितीय क्रमांकावर फलटण ३२ ग्रामपंचायती आणि तृतीय क्रमांकावर सातारा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वात कमी जावळी तालुक्यातील केवळ ७ ग्रामपंचायती या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या आहेत.या ग्रामपंचायतींचा प्रकल्प पूर्ण..प्रकल्प पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायती आहेत. त्यामध्ये क्षेत्र महाबेश्वर, बनवडी, हजारमाची, विंग, कापील, कोर्टी, शिरवडे, जुळेवाडी, तरडगाव, राजुरी, कोळकी, पाडेगाव, सासवड, ठाकूरकी, आसू, पुसेसावळी, भोसरे, नागठाणे, विलासपूर, अतीत, शिवथर, पाटखळ, खेड, शेंद्रे, काशीळ, खोजेवाडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात भाग घेऊन चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. दोन टप्प्यांतील या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात तीन हजारांवरील लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर दुसºया टप्प्यात शहरालगतच्या तसेच नदीकाठावरील ग्रामपंचायतींना समाविष्ट करण्यात येणार आहे.-कैलास शिंदे, सीईओ, जिल्हा परिषद सातारा