कऱ्हाड/कार्वे : कार्वे येथील रक्तदान शिबिराला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. कोरोनाच्या महामारी संकटकाळात रक्ताची झालेली टंचाई लक्षात घेऊन आयोजित केलेले रक्तदान शिबिर महत्त्वाचे असल्याचे मत अनेक रक्तदात्यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे अभियान राबवले आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत, कार्वे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. सरपंच संदीप भांबुरे यांच्याहस्ते दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जनार्धन देसाई, राहुल थोरात, अधिक गुजले, राजवर्धन शिंदे, सुहास पाटील, तलाठी नीलेश गवंड, चंद्रकांत पवार, जयवंत हुलवान, प्रमोद सुकरे, युवराज मोहिते, शिवाजी माळी आदींची उपस्थिती होती.
चौकट
सरपंचांनी केली सुरुवात ...
रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रतिमा पूजन करून झाल्यानंतर सरपंच संदीप भांबुरे यांनी स्वतः पहिल्यांदा रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरुवात केली.
रक्तदाते पुढीलप्रमाणे
ओ पॉझिटिव्ह
तानाजी घाडगे, राहुल थोरात, मानसिंग थोरात, आदित्य थोरात, शिवाजी कोळी, शंकर हुलवान, उत्तम देसाई, शाहरुख पठाण
बी पॉझिटिव्ह
संदीप भांबुरे, शुभम थोरात, प्रवीण थोरात, मुबारक मुल्ला
ए पॉझिटिव्ह
प्रवीण वायदंडे, सलमान पटेल,
फोटो
कार्वे येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी सरपंच संदीप भांबुरे, जनार्दन देसाई, राहुल थोरात, राजवर्धन देसाई, चंद्रकांत पवार उपस्थित होते.