वाई : ‘प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती मदत आणि सहकार्य करण्यात येत आहे. त्याबाबत सर्व तयारी पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती कोचर आयोगाच्या अहवालानुसार मांढरदेव यात्रेबाबत सर्व जबाबदारी मांढरदेव देवस्थान विश्वस्तांनी स्वीकारून नियोजन करावे,’ अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्या.मांढरदेव, ता. वाई येथे श्री काळुबाई देवीची यात्रा व धावजी बुवा यात्रेच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी मुदगल यांनी सर्व संबंधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, भोरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे, पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण, गटविकास अधिकारी रवींद्र सांगडे, खंडाळ्याच्या गटविकास अधिकारी दीपा बापटे, वाईचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पोलिस निरीक्षक विनायक वेताळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, ‘अवैध दारू विक्री करणाऱ्या संशयास्पद व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.’ (वार्ताहर)
यात्रेची जबाबदारी विश्वस्तांची
By admin | Published: January 06, 2017 11:04 PM