सातारा : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नगररचना विभागाकडील अधिसूचनेनुसार, कोडोली ते खिंडवाडी येथील राज्य मार्गाचे ४५ मीटरचे प्रस्तावित रुंदीकरण रद्द करण्यात आल्याने, कोडोली खिंडवाडी येथील या मार्गावरील रस्त्याकडेला असणाºया मिळकतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अन्यायकारण व पंख्याखाली बसून टेबल थ्रू कृती करणाºया प्रशासनास लगाम बसला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
राज्य मार्ग क्र. १४० खिंडवाडी-कोडोली या मार्गावर एकूण ४५ मीटरचे रुंदीकरण साताºयाच्या प्रादेशिक योजना आराखड्यात करण्यात आले होते. गेल्या २५-३० वर्षांपासून या ठिकाणी रितसर टाऊन प्लानिंंगची मंजुरी घेऊन घरे बांधलेल्या शेकडो लोकांच्या मिळकती, या संभाव्य रस्ता रुंदीमुळे बाधित होत होत्या.
अनेकांनी आपल्या सेवानिवृत्ती नंतरची सर्व पुंजी जमा करून, या ठिकाणी घरे बांधली होती. या अन्यायकारणरस्ता रुंदीमुळे या भागात रस्त्याकडेला असलेल्या मिळकतधारकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती.अनेकांची घरे रुंदीकरणात पूर्णपणे नेस्तनाबूत होणार असल्याची बाब स्थानिक प्रतिनिधींसह अनेक व्यक्तींनी निदर्शनास आणून दिल्यावर याबाबत आम्ही त्रिसदस्यीस समिती, प्रादेशिक योजना यांना लेखी पत्र देऊन, अन्याय होत आहे तो दूर करावा, अशी सूचना केली होती. तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवाव्यात, असेही आवाहन केले होते.विकासाची संकल्पना राबविताना, अन्यायकारक विकासाची आखणी सातारा जिल्ह्यात कोणी करू नये, अन्यथा त्यास नागरिकांच्या ग्रामस्थांच्या हितासाठी आमचा प्रखर विरोध राहील, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.रस्त्याचे प्रस्तावित रुंदीकरण रद्दजनतेच्या हरकती आणि आमच्या सूचना, ग्रामसभेचा ठराव आदी बाबी विचारात घेऊन, सातारा प्रादेशिक योजना आराखड्यास अंतिम मंजुरी देताना, राज्य मार्ग क्र. १४० कोडोली ते खिंडवाडी या रस्त्याचे प्रस्तावित ४५ मीटर रुंदीकरण रद्द करण्यात आले आहे. तशी अधिसूचना देखील ८ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आता सुमारे कोडोली-खिंडवाडी व संभाजीनगरमधील रस्त्यालगतच्या शेकडो मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.