शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

वाढत्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १५ मे पर्यंत निर्बंध वाढविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:37 AM

सातारा : वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून या अनुषंगाने निर्बंध ...

सातारा : वाढत्या कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी शासनाने १५ मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला असून या अनुषंगाने निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

१५ मे पर्यंत लावलेला लॉकडाऊन पूर्णपणे पाळला पाहिजे, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच बाजारपेठेत गर्दी करू नये. संपूर्ण कुटुंब बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे, तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी. ज्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण झाले नाही अशा नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. तसेच ज्या नागरिकांचे पहिले लसीकरण झाले आहे, अशा नागरिकांनी दुसऱ्या डोस ठरवून दिलेल्या कालावधीमध्येच घ्यावे. तसेच लसीकरणाचा मेसेज आल्यानंतरच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

फोटो ओळ : सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित बैठकीत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला सूचना केल्या.