सातारा : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची निवडणूक मतमोजणी झाली. हा निकाल ऐकण्यासाठी झालेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी महामारी संपलेली नाही. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेत कोरोनाबाबतचे निर्बंध पाळणे गरजेचे आहे.
पथदिवे बंद
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड ते दोशी विहीर या दरम्यानच्या पथदिवे बंद असून, त्या त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ता देखभालीसाठी टोलवसुली केली जात आहे.
वाहनांची अडथळा
सातारा : सातारा शहरातील मध्यवस्तीमधील रस्ते आधीच अरुंद असून, या रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील बाजारपेठेत सर्वच रस्त्यावर लगतच्या गाळेधारकांनी अतिक्रमण केले. त्यामुळे वाहन पार्किंगला जागा उरली नसल्याने ही वाहने रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा ठरत आहेत.
अतिक्रमणांमध्ये वाढ
सातारा : साईबाबा मंदिर गोडोली नाका रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, नगरपालिकेने या भाजी विक्रेत्यांना हटवून त्यांची दुसरीकडे सोय करावी, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत.
बटाट्याचा दर गडगडला
सातारा : बटाटा उत्पादकांना प्रति क्विंटल नऊशे ते बाराशे रुपये दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च नुकसानीत जात आहे. खटाव तालुका उत्तर भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
चोरटे सक्रिय
वाई : वाई शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरीच या ठिकाणी मोबाईल चोरटे सक्रिय झाले आहेत. त्यांचा शहरात सुळसुळाट झाला असून, सध्या भाजी मंडई चोरट्यांच्या रडारवर आहे. भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या वाईकर यांना मंडईतूनच मोबाईलविना परतावे लागत आहे.
अनेक उघड्या डीपी
सातारा : वाहिन्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. बहुतांशी गावांमधील शिवारात लोखंडी खांब मजले असून, वीजवाहक तारा लोंबकळत असल्याने धोकादायक बनल्या आहेत. काही ठिकाणी डीपी उघड्यावर दुरवस्थेत असल्याने शेतकऱ्यांच्या जिवाचा कोंडमारा होत आहे.
वाहतुकीची कोंडी
सातारा : येथील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. बाजारपेठेतील रस्ता अरुंद असल्याने दुपारी बारापर्यंत आणि सायंकाळी चारनंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहनांच्या रहदारीस बंदी घालण्यात आली आहे.
वाहनचालकांमधून संताप
सातारा : पुणे-बंगलोर महामार्गावर आणि वाडी येथील टोल नाक्यावर फास्टॅग असून, ही वाहतुकीची कोंडी ही रोजचीच बाब बनली असून, व्यवस्थापन मात्र यावर निष्काळजी दिसत असून, वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. तरी फास्टॅग यंत्रणा सुरळीत सुरू करण्याची मागणी वाहनचालक म्हणून होत आहे.
कास पठाराला सदिच्छा भेट (२२ पेट्री फोटो बातमी)
पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास पठारास ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग जावळचे उपअभियंता प्रवीण कांबळे यांनी सदिच्छा भेट दिली. दरम्यान, त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष बजरंग कदम, कार्यकारी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर आखाडे उपस्थित होते.