शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
2
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
3
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
4
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
5
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
6
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
7
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
8
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
9
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
10
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
11
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
12
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
13
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
14
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी
15
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
16
ठाणे, वसईत २० लाखांत घर; म्हाडाच्या कोकण मंडळाचा ‘धमाका’
17
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
18
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
19
उद्योगपती मंदाना यांची १७० कोटींची मालमत्ता जप्त; बँक ऑफ बडोदाची फसवणूक केल्याचा ठपका
20
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली

रिझर्व्ह बँकेकडून सहकारी बँकांवरील निर्बंध धोकादायक - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:39 PM

सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार प्रेरणादायी

सातारा : राज्यातील पाचशेपेक्षा जास्त सहकारी बँका बंद झाल्या असताना प्राथमिक शिक्षक बँकेची दमदार वाटचाल इतर बँकांसाठी प्रेरणादायी आहे. तथापि, अडचणीतील बँकांना आधार देण्याएवजी रिझर्व्ह बँकेकडून निर्बंध लावले जातात, हे सहकारासाठी धोकादायक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.सातारा येथे रविवारी प्राथमिक शिक्षक बँकेच्या शतकमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयंत आसगावकर, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे, अध्यक्ष किरण यादव, उपाध्यक्ष शहाजी खाडे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक उपस्थित होते.खासदार पवार म्हणाले, ‘सहकारात उठावदार कामगिरी करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, सध्या सहकार क्षेत्र अडचणीत आणण्याचे उद्योग सुरू आहेत. अडचणीतील संस्थांना आधार देण्याऐवजी निर्बंध लादून अडचणी वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. रिझर्व्ह बँकेने निर्बंध लावण्याबाबत दुमत नाही, मात्र ज्या बँका पुन्हा स्थिरस्थावर होऊ शकतात त्यांना सहकार्यही केले पाहिजे. सातारची प्राथमिक शिक्षक बँक कर्ज वितरण व वसुलीमध्ये अग्रेसर आहे. शिक्षकांची आधारवड बनत असताना सभासदांच्या पाल्यांनाही शिक्षणासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देऊन बँकेने भावी पिढी घडवण्याचेच काम चालवले आहे.’

चोख कारभारासाठी महिलांना संधी हवीकृ. बा. बाबर यांनी सुरू केलेल्या बँकेचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झाले आहे. त्यांच्या कन्या सरोजिनी बाबर व आम्ही विधानमंडळात एकत्र काम केले आहे. प्राथमिक शिक्षक बँकेने दोन महिलांना संचालकपदाची संधी दिल्याचे समाधान आहे. ही संधी उपलब्ध करून देण्यात आमचाच वाटा आहे. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांचाच नसून सर्वांना संधी मिळाली पाहिजे. महिलांना सहभागी केल्यास आणखी चोख व्यवहार होईल, असेही पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSharad Pawarशरद पवार