शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रेठरे बुद्रूक सोसायटी : खत विभागात तेवीस लाखाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 11:28 AM

fraud Crimenews Satara karad- रेठरे बुद्रूक, ( ता. कऱ्हाड ) येथील विकास सोसायटीच्या खत विभागात २०१२ ते २०१५ या कालावधीत २३ लाख ५४ हजार ७६७ रुपयांचा अपहार झाल्याचे फेरलेखा परिक्षणात आढळून आले आहे. याबाबत उपलेखापरिक्षक रोहीत सुर्यवंशी यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्कालिन खत विभाग प्रमुखाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

ठळक मुद्देरेठरे बुद्रूक सोसायटी : खत विभागात तेवीस लाखाचा अपहार तत्कालिन विभाग प्रमुखावर गुन्हा दाखल

कऱ्हाड : रेठरे बुद्रूक, ( ता. कऱ्हाड ) येथील विकास सोसायटीच्या खत विभागात २०१२ ते २०१५ या कालावधीत २३ लाख ५४ हजार ७६७ रुपयांचा अपहार झाल्याचे फेरलेखा परिक्षणात आढळून आले आहे. याबाबत उपलेखापरिक्षक रोहीत सुर्यवंशी यांनी कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात तत्कालिन खत विभाग प्रमुखाविरोधात फिर्याद दाखल केली आहे.दिनकर बाळकृष्ण सोमदे (रा. रेठरे बुद्रूक) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालिन खत विभाग प्रमुखाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील विकास सेवा सोसायटीच्या खत विभागात दिनकर सोमदे हा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होता.

त्यावेळी सोसायटीच्या खत विभागाचे १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीतील लेखा परिक्षण करण्याचे आदेश १० नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. या आदेशानुसार उपलेखा परिक्षक रोहीम सुर्यवंशी यांनी लेखा परिक्षणाचे काम पूर्ण केले असून फेर लेखा परिक्षणाअंती दिनकर सोमदे याने २३ लाख ५४ हजार ७६७ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे.२०१२ ते २०१५ या कालावधीतील रोख विक्री पुस्तक ते विक्री रजिस्टर तपासणी करीत असताना ६ लाख २६ हजार ३०४ एवढी रक्कम लेखा परिक्षकांच्या निदर्शनास आली आहे. तर उधार विक्री पावती दर आणि रोख विक्री पावती दर यामध्ये तफावत आढळून आली आहे.

उधार विक्री दरापेक्षा रोखीने विक्री केलेल्या पावत्या या कमी दराने काढलेल्या असून फरकाची रक्कम अपहारीत असल्याचे लेखा परिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या कालावधीतील नावे व्हाऊचर तपासणी करीत असताना निदर्शनास आलेली रक्कम १७ लाख २८ हजार ४६३ एवढी आहे.

रोजकिर्दीला रोखीने वाहतूक खर्चाची बिले खर्ची पडली असून नमूद वाहतूक व्हाऊचरसोबत वाहतुकीची बिले उपलब्ध नसल्यामुळे सदरच्या फरकाची रक्कम ही अपहारीत रक्कम असल्याचे लेखा परिक्षकांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसKaradकराड