सातारा : सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.खंडाळा तालुक्यात सोमवारी सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सात या चोवीस तासांत तब्बल ११४ तर वाठार बुद्रुक मंडलात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे लोणंदच्या खेमावती नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिरवळ येथील सटवाई कॉलनीतील मांड ओढ्यावरील पूल महिनाभरात तब्बल सात वेळा पाण्याखाली गेला आहे.खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती जलमय झाल्याने नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे. खंडाळ्यासह फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही परतीच्या पावसाने झोडपून काढले. कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथील वसना नदीवरील पुलाचा भराव वाहून गेल्याने तीन गावांचा संपर्क तुटला आहे.या पावसामुळे माण, खटाव तालुक्यांतील नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. काही ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला असून, जिल्ह्यातील १ हजार ३०९ गावांतील अंदाजे ११ हजार ८०० हेक्टरवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे.यंदा दुप्पट पाऊससातारा जिल्ह्यात यावर्षी ३१ आॅक्टोबरपर्यंत पाच महिन्यांत १ हजार ७६१ मिलिमीटर पाऊस पडलाय. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८३४.२५ मिलिमीटर पाऊस होतो. तर आॅक्टोबरपर्यंत ९१८ मिलिमीटरपर्यंत पर्जन्यमानाची नोंद होते; पण यावर्षी तब्बल १ हजार ७०० हून अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १९१ इतकी आहे. म्हणजे जवळपास यावर्षी दुप्पट पाऊस झाला आहे.महाबळेश्वरात सर्वाधिक नोंदजिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात ३१ आॅक्टोबरअखेरपर्यंत सर्वाधिक ८ हजार १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसाची टक्केवारी ३६५ इतकी आहे. तर सातारा तालुक्यात २ हजार २४४, जावळी २ हजार ७८८, पाटण २ हजार ४६७, कºहाड १ हजार ३६३, कोरेगाव १ हजार ८०, खटाव ८६२, माण ५७५, फलटण ५८६, खंडाळा ९१२ आणि वाई तालुक्यात १ हजार २५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सातारा जिल्ह्याला परतीचा तडाखा, शिरवळमध्ये चोवीस तासांत ११४ मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:57 PM
सातारा जिल्ह्याला परतीच्या पावसाने यंदा अक्षरश: झोडपून काढले असून, अजूनही ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरूच आहे. कधी नव्हे ते दुष्काळी माण, खटाव व फलटण तालुक्यातही दमदार पाऊस झाल्याने नदी, ओढे, तलाव, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. परंतु शेतीपिकांचे प्रचंंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
ठळक मुद्देखेमावती नदीला पूर, वसना नदीवरील पुलाचा भराव गेला वाहूनतीन गावांचा संपर्क तुटला, फलटण तालुक्याच्या पश्चिम भागालाही झोडपले