सातारा : राजवाडा येथील पालिकेच्या जुन्या कार्यालयाची गॅलरी मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे ढासळली. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. अतिक्रमण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गॅलरीचा धोकादायक भाग तातडीने हटविला.याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा पालिकेचे जुने कार्यालय राजवाड्याच्या इमारतीला लागूनच आहे. कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून, गॅलरीची देखील मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. शहर व परिसरात सलग तीन दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसामुुळे गॅलरीचा दर्शनी भाग मंगळवारी रात्री अचानक कोसळला. घटनास्थळी कोणीही नसल्यााने मोठी हानी टळली.या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अतिक्रमण विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाचारण केले. जेसीबीच्या साह्याने गॅलरीचा धोकादायक भाग हटविण्यात आला. दुसऱ्या गॅलरीचा भागही पडण्याच्या मार्गावर असल्याने तोही तातडीने हटविला जाईल, अशी माहिती उपनगराध्यक्ष शिंदे यांनी दिली.
सातारा पालिकेलाही परतीचा तडाखा, जुन्या कार्यालयाची गॅलरी ढासळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 2:11 PM
Satara area, Muncipal Corporation, rainnews राजवाडा येथील पालिकेच्या जुन्या कार्यालयाची गॅलरी मंगळवारी रात्री मुसळधार पावसामुळे ढासळली. या घटनेत कोणतीही मोठी हानी झाली नाही. अतिक्रमण विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गॅलरीचा धोकादायक भाग तातडीने हटविला.
ठळक मुद्दे जुन्या कार्यालयाची गॅलरी ढासळली