दहिवडी : येथील महसूल विभागाची नवीन इमारत उभी राहिली आहे; पण या इमारतीचे बांधकाम अजून अपूर्ण अवस्थेत आहे. बांधकाम पूर्ण होऊन महसूल विभागाची सर्व कार्यालये स्वतंत्र क्षमतेने कधी सुरू होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची नितांत गरज आहे.
तहसील कार्यालयाची इमारत ब्रिटिशकालीन असून, ही इमारत कालबाह्य होत आहे. पूर्वीपासून या इमारतीत महसूल विभागाचा कारभार चालायचा. नवीन इमारत बांधण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी जुनी इमारत पाडणे आवश्यक आहे. मात्र नव्या इमारतीचे निम्मेच काम झाले आहे. अर्धवट काम झालेल्या इमारतीमध्येच सध्या तहसील कार्यालयाचा संसार थाटून कारभार सुरू आहे. नवीन इमारतीच्या परिसरात जुन्या निवासी इमारती आहेत. या पूर्णपणे मोडकळीस येऊन जीर्ण झाल्या आहेत. त्या जणू शेवटच्या घटका मोजत आहेत. तर याच परिसरात तहसीलदारांचे जुने बंद निवासस्थान आहे. त्याचीही दुरवस्था झाली आहे. तेही घाणीच्या साम्राज्यात अडकले आहे. तहसील कार्यालयाची ब्रिटिशकालीन जुनी इमारत सध्या बंद अवस्थेत असून, तेथील कारभार नव्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे त्या इमारतीची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे अपूर्ण काम होणे आवश्यक आहे, मात्र या कामाचे घोडे कशात अडकले आहे, हा संशोधनाचा भाग ठरणार आहे. जीर्ण इमारतींची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी त्या पाडण्यात याव्यात; अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो.
दहिवडी पोलिसांचा चुटका
जुन्या तहसील कार्यालयाच्या आवारात पोलीस ठाणे कार्यरत आहे, मात्र त्याचीही वाईट अवस्था झाली होती. पावसाळ्यात या इमारतीत छत्री धरून कारभार चालायचा. मात्र त्याच परिसरातील महसूल विभागाच्या पोट कार्यालयाचे स्थलांतर नवीन इमारतीत झाले होते. या मोकळ्या झालेल्या जुनाट इमारतीची छान डागडुजी, रंगरंगोटी पोलिसांनी करून जुन्याचं सोनं करून तेथून कारभार सुरू केला. दहिवडीचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या इमारतीचं रुपडं छानसं बदलून टाकलं आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. जुन्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावून नवीन अर्धवट असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
कोट येणार आहे...
फोटो दहिवडी गव्ह. ऑफिस
दहिवडी येथील माण तहसील कार्यालयाची जुनी इमारत जीर्ण झाली आहे. (छाया : नवनाथ जगदाळे)