लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कितीही तक्रारी झाल्या किंवा तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई झाली तरी लाचखोरी थांबत नाही. गत पाच वर्षांत १३४ तर चालू वर्षात सातजण लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. या कारवायांमध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवरच जास्त कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक सापळा कारवाई सातारा तालुक्यात झाली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांना लाखचोरीने पोखरले आहे. वारंवार कारवाई होऊनही कर्मचाऱ्यांची वरकमाईची चटक कमी झालेली नाही. पुढच्याला ठेच लागूनही मागचा शहाणा झाल्याचे दिसत नाही. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेकजण वरची कमाई घेतात. कर्मचाऱ्यापासून ते मोठ्या पगारदार अधिकाऱ्यांचाही त्यामध्ये समावेश असतो. त्यांना पैशाची लालसा असते. त्यामुळेच लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या किंवा लाचखोरीला कंटाळलेल्यांकडून अशा प्रकारांबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली जाते आणि या तक्रारीची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तातडीने सापळा कारवाई करून लाच स्वीकारणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या जातात. या कारवाईने काही काळ खळबळ उडते. मात्र, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती निर्माण होते.
- चौकट
वर्षनिहाय तालुक्यांतील कारवाई
तालुका : २०१६ : २०१७ : २०१८ : २०१९ : २०२०
सातारा : ८ : १४ : ६ : ९ : ६
कऱ्हाड : ६ : ४ : ६ : ४ : ४
फलटण : १ : १ : ३ : ३ : १
माण : ३ : ० : ३ : १ : १
खटाव : ४ : ३ : २ : १ : ०
कोरेगाव : ० : १ : ० : ३ : ३
म’श्वर : १ : १ : ० : ० : १
वाई : २ : २ : ० : ४ : २
खंडाळा : २ : १ : १ : ० : २
जावळी : ० : २ : १ : ० : २
पाटण : १ : ३ : ३ : १ : १
- चौकट
पाच वर्षांतील कारवाई
सातारा : ४३
कऱ्हाड : २४
वाई : १०
खटाव : १०
फलटण : ९
पाटण : ९
माण : ८
कोरेगाव : ७
खंडाळा : ६
जावळी : ५
महाबळेश्वर : ३
- चौकट
जानेवारी २०२० ते १५ मे २१२१ अखेर...
वन विभाग : २
कामगार खाते : १
महसूल विभाग : १०
पोलीस : ६
महावितरण : २
विधी व न्याय : १
नगरविकास : १
ग्रामविकास : १
पत्रकार : १
सरपंच : २
अन्न व नागरी पुरवठा : १
बांधकाम विभाग : १
आरटीओ एजंट : १
एकूण कारवाई : ३०
- चौकट
लाचखोरीत सरासरी
महसूल : २९ टक्के
पोलीस : १८ टक्के
महावितरण : ९ टक्के
वन विभाग : १२ टक्के
इतर : ३२ टक्के
- कोट
भ्रष्टाचाराबाबत काही माहिती असल्यास अथवा कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केली तर संबंधित नागरिकाने तत्काळ सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करावा. लाचखोरी रोखण्यासाठी नागरिकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा