शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

चाऱ्याबाबत खटावचा कृषी विभाग अनभिज्ञ -वडूज येथे आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 8:35 PM

खटाव पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, तो किती दिवस टिकेल,असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र,

ठळक मुद्देचाऱ्याबाबत खटावचा कृषी विभाग अनभिज्ञ अधिकारी, पदाधिकाºयांची उपस्थिती

वडूज : खटाव पंचायत समितीच्या सभागृहात दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याबाबत टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुक्यात सध्या किती चारा उपलब्ध आहे, तो किती दिवस टिकेल,असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, तालुका कृषी अधिकारी शिवाजीराव चौगुले यांना त्याची योग्य माहिती देता आली नाही. यावेळी त्यांचा गोंधळ उडाला. त्यामुळे कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी अधिकाºयांना फैलावर घेतले.

आढावा बैठकीस आ. शशिकांत शिंदे, माजी आ. प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निबांळकर, सभापती कल्पना मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, सुनीता कचरे, कल्पना खाडे, उपसभापती संतोष साळुंखे, माजी सभापती संदीप मांडवे, माजी उपसभापती कैलास घाडगे, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, आनंदराव भोंडवे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब इंगळे, राजेंद्र कचरे, सुनील घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चारा उपलब्धतेच्या प्रश्नांवर चौगुले यांनी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दुर्गाप्रसाद उंडेगावकर यांच्याकडे बोट दाखवले. त्यावर तुमची जबाबदारी असल्याने तुमच्याकडे माहिती असणे गरजेचे आहे, असा मुद्दा आ. बाळासाहेब पाटील यांनी मांडला. त्यावर कृषी अधिकाºयांनी आपल्याकडे डबल चार्ज आहे. त्यामुळे माहिती उपलब्ध नाही असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदाधिकाºयांचा अधिक आग्रह झाल्यानंतर पशुसंवर्धन विभागाची टिप्पणी वाचून दाखवत पदाधिकाºयांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातून पाण्याच्या टाक्या घेण्याबाबत जिल्हा परिषदेने परवानगी देण्याची मागणी केली. तर प्रदीप विधाते यांनी बोअरवेल दुरुस्ती यंत्रणा वाढविण्याबरोबर वर्गणीची अट शिथील करण्याची मागणी केली. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी उरमोडी लाभक्षेत्रात प्रामुख्याने चारा लागवड करा, महसूल विभागाने टँकर प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये. तसेच दुष्काळ परिस्थितीवर पदाधिकारी, अधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी समन्वयातून मार्ग काढावा, असे आवाहन केले.सभापती कल्पना मोरे यांनी स्वागत केले. चाँद काझी यांनी सूत्रसंचालन केले. उपसभापती संतोष सांळुंखे यांनी आभार मानले.

 

-खटाव तालुक्यात निर्माण झालेली दुष्काळ परिस्थिती अंत्यत गंभीर आहे. तरी खटाव तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीत समावेश् केला नाही. त्यामुळे खटाव दुष्काळग्रस्त जाहीर करण्याबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे.शशिकांत शिंदे, आमदार-खटाव तालुक्यात उरमोडी धरणातील पाणी परिसरातील पारगाव, येळीव व इतर छोट्या-मोठ्या पाझर तलावात सोडल्यास परिसरातील शेतीला पाणी मिळेल. त्यामुळे त्वरित उरमोडीचे पाणी सोडा.-बाळासाहेब पाटील, आमदारउन्हाळा सुरु होण्यापूर्वीच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे तालुक्यातून ज्या गावांनी टँकरचे प्रस्ताव पाठविले असतील, ते प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, टँकर तपासून घेणे, टँकर सुरू करण्यापूर्वी स्थानिक उपाययोजनांना प्राधान्य द्या.-संजीवराजे नाईक-निंबाळकर, अध्यक्ष, जिल्हा परिषद

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी