शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

मेगा फूड पार्कमुळे साताऱ्यात घडणार क्रांती

By admin | Published: May 17, 2017 11:16 PM

मेगा फूड पार्कमुळे साताऱ्यात घडणार क्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘भारतीय उद्योजक जगतातील एक माईल स्टोन अशी ओळख निर्माण झालेल्या भारत विकास ग्रुपने (बीव्हीजी) विविध क्षेत्रांत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगार निर्मिती करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून आता साताऱ्यात ऐतिहासिक अशी औद्योगिक क्रांती घडत आहे. सातारा शहरानजीक देगाव येथे तब्बल ६८ एकर जागेत महत्त्वाकांक्षी असा ‘सातारा मेगा फूड पार्क’ प्रकल्प साकारला जात असून, या फूड पार्कमुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील उद्योजकतेला पुन्हा एकदा चालना मिळेल,’ असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त असून, रोजगार निर्मितीला नेहमीच प्राधान्य देऊ असे स्पष्ट केले. साताऱ्याचा औद्यागिक विकास व्हावा, रोजगार निर्मितीबरोबरच साताऱ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची विस्तारवाढ करण्याचा प्रयत्न केला होता. साताऱ्यात विविध प्रकारच्या कंपन्या याव्यात, रोजगार निर्मितीत वाढ व्हावी, यासाठी आपणही सातत्याने प्रयत्न केले आहेत. देगाव येथील ६८ एकरात साकारल्या जाणाऱ्या मेगा फूड पार्क प्रकल्पात विविध प्रकारची तब्बल ३० फूड प्रोसेसिंग युनिटस् उभी राहणार आहेत. ६८ एकरात केलेल्या प्लॉटिंगमध्ये बीव्हीजीसह देशभरातील मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आपले प्रकल्प उभारणार आहेत. यामध्ये मिल्क प्रॉडक्टस, बेकरी प्रॉडक्टस, जॅम, जेली, विविध प्रकराचे मसाले, ज्यूस, मिनरल वॉटर, फूड प्रोसेसिंग युनिटस्, आटा आदी खाद्य पदार्थांशी निगडीत प्रकल्पांचा समावेश असणार आहे. ३० पैकी १५ युनिट खुद्द बीव्हीजीची आहेत. यामध्ये मिल्क प्रॉडक्टस, जाम, फ्रूट ज्युसेस, फ्रूट पल्प, विविध प्रकारचे मसाले, आटा, मिनरल वॉटर आदी प्रकल्प बीव्हीजी उभारत आहे. या १५ पैकी ५ प्रकल्पांचे काम पूर्णत्वास गेले असून, येत्या एक-दोन महिन्यांत हे पाचही प्रकल्प सुरू होणार आहेत. सातारा मेगा फूड पार्क म्हणजे एक रोजगार क्रांतीच ठरणार आहे. या प्रकल्पामुळे किमान ८ ते १० हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे साताऱ्यातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळेल,’ असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या सहकार्यामुळेच गेल्या दीड वर्षापूर्वी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. आता हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे पाठबळ कायम असल्यानेच हे साध्य झाल्याचे बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी यावेळी सांगितले. या फूड पार्कमधील बीव्हीजीची पाच युनिटस् सुरू होत असून, यासाठी लागणारा कच्चा माल स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट उचलला जाणार आहे. बेरोजगारांना कामाची संधी..देगाव येथील ६८ एकरात साकारल्या जाणाऱ्या सातारा मेगा फूड पार्क प्रकल्पात विविध प्रकारची तब्बल ३० फूड प्रोसेसिंग युनिटस् उभी राहणार आहेत. ६८ एकरात केलेल्या प्लॉटिंगमध्ये बीव्हीजीसह देशभरातील मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी आपले प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पासाठीच्या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करताना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बीव्हीजीला आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मदतीमुळेच या तीनही समस्यांवर मात करता आली. साताऱ्याच्या औद्योगिक क्रांतीला चालना मिळावी, बेरोजगारांना रोजगार मिळावा, या हेतूने आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: सूतगिरणीची रस्त्यासाठी लागणारी जागा या प्रकल्पासाठी देऊ केली.