शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

सातारी फेट्यात अमीरचे उद्गार, ‘लय भारी !’ अनपटवाडीत ग्रामस्थांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:34 AM

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेता अमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’

ठळक मुद्दे डॉक्युमेंटरी चित्रीकरणाची लगबग : ; जलसंधारण कामांची केली पाहणी

पिंपोडे बुद्रुक : सातारा जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेची कामे करताना गावकऱ्यांनी दाखविलेली एकी पाहून सातारी फेटा बांधलेल्या अभिनेताअमीर खानच्या तोंडून एकच डॉयलॉग बाहेर पडला, ‘लय भारी !’.. कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथे डॉक्युमेंटरीच्या चित्रिकरणासाठी पत्नी किरण रावसह अमीर खान आले होते.तुफान आलंया,’ आता पाणी डोळ्यात नाही, तर गावात पाहिजे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे,’ असे आवाहन ‘सत्यमेव जयते पाणी फांऊडेशन’चे अमीर खान यांनी केले. ‘सत्यमेव जयते’ राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात या स्पर्धेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे झाली आहेत. पहिल्यावर्षी स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता.

वॉटर कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ‘सत्यमेव जयते’ पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अनपटवाडी, (ता. कोरेगाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे काम करून दुष्काळावर मात केली आहे. वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होण्यास आणखी काही अवधी असताना अमीर खान जलसंधारणाच्या कामांची पाहणी व फाउंडेशनच्या कामांच्या डॉक्युमेंटरी चित्रीकरणासाठी अनपटवाडी, ता. कोरेगाव येथे आले होते.

त्यावेळी त्यांनी अनपटवाडीचे सरपंच मनोज अनपट व ग्रामस्थ यांच्याकडून जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, कोरेगाव प्रांत कीर्ती नलावडे, तहसीलदार स्मिता पवार, नायब तहसीलदार विठ्ठलराव पोळ व सरपंच मनोज अनपट आदी उपस्थित होते.दुष्काळावर मात करण्यासाठी आता युवकांनी पुढाकार घेण्याची गरज असून, युवकांनी ‘जलमित्रा’च्या भूमिकेतून श्रमदान अथवा आर्थिकदृष्ट्या सहकार्य करावे. असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले.विद्यार्थ्यांना दिले पाणी बचतीचे धडेऔंध : खटाव तालुक्यातील जाखणगाव या गावास अभिनेता अमीर खान यांनी भेट देऊन ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानसह पाणी बचतीबााबत मार्गदर्शनही केले. ते म्हणाले, ‘श्रमदानाने अनेक गावे दुष्काळमुक्त झाली असून, आपल्या गावाची एकी महत्त्वाची ठरली आहे. ही एकी अशीच अबाधित ठेवावी.’ तसेच ‘आपण आई-वडिलांच्या जवळ हट्ट धरून डोंगरात जाऊन श्रमदान करावे,’ असे आवाहन जितेंद्र जोशी यांनी केले. यावेळी डॉ. अविनाश पोळ, गीतांजली कुलकर्णी, बाळासो शिंदे यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. 

‘पाणी फाउंडेशन’च्या वतीने लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे अनेक गावांची दुष्काळावर कायमस्वरुपी मात केली असून, यापुढे पाणीदार गाव म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- मनोज अनपट,

सरपंच अनपटवाडी‘पाणी फाउंडेशन’ कार्याच्या चित्रीकरणासाठी ‘फाउंडेशन’चा सर्वेसर्वा अमीर खान याने आमच्या गावाची केलेली निवड हा ग्रामस्थांच्या कार्याचा गौरव आहे.-रामदास बोबडे,ग्रामस्थ अनपटवाडी.

टॅग्स :Aamir Khanआमिर खानSatara areaसातारा परिसरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा