शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केली होती मात
2
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
3
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
4
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
5
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
6
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
7
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
8
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
9
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
10
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
11
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
12
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
13
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
14
"राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर..."; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान
15
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
16
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
17
पोलीस हेड कॉन्स्टेबलच्या पत्नी आणि मुलीची हत्या, आरोपी फरार, संतप्त जमावाकडून तोडफोड
18
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
19
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'
20
तो पाकिस्तानचा प्रॉब्लेम! Babar Azam संदर्भातील प्रश्नावर Ben Stokes चा रिप्लाय चर्चेत

साताऱ्यातील पुसेसावळीत दंगल: नेटवर्क बंद, व्यवहार ठप्प; नेटकरी अस्वस्थ..पालकवर्ग खूश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 12:52 PM

रेल्वे प्रवाशांना मात्र नेटवर्कचा कोणताही परिणाम जाणवला नाही

संतोष खरात लोणंद : खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात तीन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली असली तरी सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेल्या दोन दिवसापासून बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून पुसेसावळीत रविवारी (दि.१०) रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. जाळपोळ झाल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीसाठी संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ७२ तासांसाठी बंद ठेवली होती.याचा परिणाम सर्वसामान्य नागरीकांसह, व्यापारी वर्ग, पतसंस्था, वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदारांपासून शालेय विद्यार्थ्यांवर झाला असून नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या नागरीकांची मोठी तारांबळ उडाली. काही बँका वगळता अनेक बँकाचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले. नेट बंद असल्याने नेटकऱ्यांना मात्र चैन पडत नव्हता. 

नेट बंदमुळे मुले मैदानातघरातील लहान मुलही नेट नसल्याने मैदानाकडे खेळावयास बाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत मोबाईलवर ऑनलाईन गेमींग व यु ट्यूब पाहणारा युवा वर्ग मोबाईल पासून दूर होता. यामुळेच गेली दोन दिवस शाळकरी मुले वेळेवर झोपत असल्याने पालक वर्ग खूश होता.रेल्वे सेवा अखंडपणे सुरळीत रेल्वे प्रवाशांना मात्र नेटवर्कचा कोणताही परिणाम जाणवला नाही. कारण भारतीय रेल्वेचे नेटचे जाळे स्वतंत्र असल्याने कराड, सातारा, कोरेगाव, राहिमतपूर, वाठार,  लोणंद या स्थानकावर वायफाय सुरू होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिसInternetइंटरनेट