शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, ४८ लोक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 1:09 PM

सातारा : जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा अचानकपणे दुपटीने वाढला. तब्बल ४८ लोक बाधित आढळले असल्याने जिल्हावासियांची चिंता ...

सातारा : जिल्ह्यामध्ये आज, शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा अचानकपणे दुपटीने वाढला. तब्बल ४८ लोक बाधित आढळले असल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. मुंबई, पुणे, सोलापूर या महानगरांमध्ये देखील संख्येत प्रचंड वाढ झाली. आता साताऱ्यामध्ये देखील रुग्णांची वाढ झालेली आहे. शुक्रवारी २ हजार ५३४ तपासण्या करण्यात आल्या त्यातून ४८ लोक कोरोना बाधित आढळले. कोरोना रुग्ण वाढीचा दर १.८९ टक्के इतका वाढला.पहिल्या आठवड्यामध्ये रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळते. मागील मंगळवारी १३ रुग्ण आढळले होते. त्यानंतर बुधवारी २१, गुरुवारी २१ आणि आता शुक्रवारी ४८ रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्ह्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. या परिस्थितीमध्ये अचानकपणे जर रुग्ण संख्या वाढली तर रुग्णांची हेळसांड होण्याची शक्यता असून लोकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी अनेक जण अजूनही मास्कचा वापर करत नाहीत. कार्यक्रम, विवाह सोहळे यांना प्रचंड मोठी गर्दी होत आहे.या परिस्थितीमध्ये मागील लाटेप्रमाणे जर कोरोनाची लाट उसळली तर लोकांना पळता भुई थोडी होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक केले आहेत. रात्री साडेनऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश लागू आहेत. कोरोना पासून बचावासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने चिंतेत भरजिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये पाच तर सातारा तालुक्यामध्ये एक असे एकूण ओमायक्रॉन बाधित सहा रुग्ण आढळून आलेले आहेत. परदेशी प्रवासातून साताऱ्यात आलेल्या लोकांची तपासणी केल्यानंतर त्यापैकी बरेच जण कोरोनाबाधित आले त्यांचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत, त्यापैकी सहा जणांचे नमुने ओमायक्रॉन बाधित आले आहेत, अजूनही काही नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या