लोकमत न्यूज नेटवर्करेठरे बुद्रुक : येथील कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारी करणाºयांना मगरीचे दर्शन झाले. त्यांनी तातडीने तेथून गावात धूम ठोकली. माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायतीने दवंडी देऊन कोणीही पात्राकडे जाऊ नये, असे आवाहन केले.रेठरे बुद्रुक येथे नदीपात्रात मासेमारी करणाºयांची संख्या जास्त आहे. गावालगत असलेल्या खडकावर अनेक मच्छीमार दिवसभर मासे पकडण्यासाठी थांबतात. हौशी ग्रामस्थ गळ टाकून मासा पकडण्याचा प्रयत्न करतात. बुधवारी सकाळीही काही मच्छीमार मासे पकडण्यासाठी नदीपात्राकडे गेले होते.पात्रात जाळे टाकून ते बसलेले असताना अचानक दोन मगरींचे त्यांना दर्शन झाले. त्यामुळे साहित्य तेथेच टाकून त्या मच्छीमारांनी पात्राबाहेर पळ काढला. काही अंतरावर जाऊन पुन्हा त्यांनी खात्री करून घेतली. त्यावेळी त्या दोन्ही मगरीच असल्याचे त्यांना दिसले. संबंधित मासेमारी करणाºयांनी तातडीने याबाबतची माहिती ग्रामपंचायतीत दिली. काही वेळांतच ही बाब वाºयासारखी गावात पसरली. अनेकांनी मगर पाहण्यासाठी नदीकाठावर धाव घेतली.दरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामपंचायतीने गुरुवारी सकाळीच गावात दवंडी दिली. नदीपात्रामध्ये मगर असल्यामुळे कोणीही पात्राकडे जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले. पात्रामध्ये असलेल्या खडकावर दररोज महिला धुणी धुण्यासाठी जातात. तसेच अनेक ग्रामस्थ आपली जनावरे धुण्यासाठीही त्या परिसरात जातात. मगरीमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने गावातदवंडी दिली.
मगर नदीत; पण खळबळ गावात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 12:20 AM