भुर्इंज : पाचवड ता. वाई येथील आपुलकी मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांनी पाचवड बाजारपेठ ते यशवंतराव चव्हाण विद्यालयापर्यंत जाणारा सुमारे अर्धा किलोमीटरच्या रस्त्याची डागडुजी केली. त्यांच्या या मोठ्या कामाचे ग्रामस्थांनी तोंडभरून कौतुक केले.पाचवड बाजारपेठ ते यशवंतराव चव्हाण विद्यालयापर्यंत जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले खड्डे व विस्कटलेली खडी वर्गणी काढून श्रमदानाने दुरूस्त केला. बाजारपेठ ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या रस्त्यावर अनेक खड्डे मोठे होत दिवसेंदिवस वाढतच होते. यापासून सुटका व्हावी, यासाठी पाचवड येथील आपुलकी मतिमंदांच्या शाळेच्या संचालिका सुषमा पवार, अनिल पवार, संजय गायकवाड, विकास पवार, नितीन जाधव, सुधीर भोसले, सतीश भोंडवे, महेश पाटणकर, रूपक शेवते, किरण चव्हाण, राजेश पोळ यांनी सहकार्य केले. आपुलकीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील लहान मोठे खड्डे मुरूमाच्या सहायाने बुजवले. याविषयी आपुलकी शाळेच्या मतिमंद विद्यार्थ्यांचे कौतुक परिसरातील नागरकि , व्यापाऱ्यांनी केले. (वार्ताहर)
‘आपुलकी’च्या विद्यार्थ्यांनी केली रस्त्याची डागडुजी
By admin | Published: February 10, 2015 9:38 PM