सातारा : शहर व तालुक्यात तसेच खटाव तालुक्यातील औंध येथे दरोडा, गर्दी मारी, मारामारी, खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली.
टोळीप्रमुख आकाश संदीप साबळे (वय २३, रा. शिवथर, ता. सातारा), साहिल अय्याज इनामदार (२०, रा. केसरकर पेठ, सातारा), शाकीर शाकीब बाबा शेख (२६, रा. मल्हारपेठ सातारा), तेजस ऊर्फ
भाऊ रमेश कदम (२६, रा. चंदननगर कोडोली, सातारा), रामा शिवाप्पा
बनसोडे (३३, रा. रविवार पेठ, सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अधिक माहिती अशी, आकाश साबळे, साहिल इनामदार, शाकीर शेख, तेजस
कदम, रामा बनसोडे अशा पाच सराईतांची टोळी बनली होती. या टोळीवर सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी परिसरात दरोडा, गर्दी, मारामारी, तसेच औंध हद्दीत खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल होते. या टोळीचा सर्वसामान्यांना उपद्रव वाढू लागल्याने टोळीतील पाचजणांना हद्दपार करण्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. यावर सुनावणी होऊन या पाचही जणांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. या टोळीस वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. या टोळीकडून जिल्ह्यात हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. आदेशाची बजावणी झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांना सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असाही आदेश देण्यात आला आहे.
या कामी प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
निरीक्षक किशोर धुमाळ, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर,
स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.
फोटो : आयकार्ड आहेत.