पुसेसावळी: खटाव तालुक्यातील वडगाव (ज.स्वा) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेवरील दरोडयातील चोरटयांना औंध व पुसेसावळी पोलिसांकडून काही तासात उलगडा करुन संशयितांना बेड्या ठोकल्या. हर्षवर्धन हरिशचंद्र घार्गे (वय २०, रा. शाहुनगर ता. जि. सातारा, यश संजय घार्गे (१९, रा. दौलत नगर ता. जि. सातारा) व रूषीकेश सोमनाथ नागमल (२०, रा. वडगांव ज.स्वा.ता.खटाव जि.सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे परिसरातील ग्रामस्थांकडून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, काल, रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वडगाव येथील शाखेवर दरोडा टाकला होता. बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज कापून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरट्यांच्या हाती रोकड लागली नाही.या घटनेची माहिती मिळताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांच्या तीन वेगवेगळया टिम बनवून सीसीटीव्ही व मोबाईल सीडीआर यांचे तांत्रिक माहितीवरून दोन संशयीत आरोपींना गुन्हयात वापरण्यात आलेली चार चाकी स्कॉरपीओ क्रमांक एम एच ०६ क्यू. ८८८८ ही गाडीसह सातारा येथून ताब्यात घेतले. तसेच एका आरोपीस वडगांव ज.स्वा. ता. खटाव येथून ताब्यात घेण्यात आले.
सातारा जिल्हा बँकेच्या वडगाव शाखेत दरोडा: औंध पोलिसांनी संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 2:44 PM