शिरवळ : ‘रोटरी क्लबमार्फत येत्या काळात पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, यामध्ये वृक्षसंवर्धन हा उपक्रम राबविण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत निर्माण करण्याकरिता रोटरी क्लब प्राधान्य देणार आहे. येत्या काळात रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा आपल्या कार्यातून नावलौकिक वाढवेल,’ असे मत रोटरी क्लबच्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांनी केले.
शिरवळ, ता. खंडाळा याठिकाणी रोटरी क्लब शिरवळ-खंडाळा २०२१-२२ चे नूतन अध्यक्ष अविनाश वाडकर, नूतन सचिव लक्ष्मण कोंडे व संचालक मंडळाच्या पदग्रहण समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी उपप्रांतपाल नितीन कदम, वाई अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष डाॅ. विनय जोगळेकर, बाळ पंडित, डॉ. विना पंडित, मावळते अध्यक्ष महेश सोनावणे, मावळते सचिव फिरोज पठाण, डाॅ. सुनील धुमाळ, हिरालाल घाडगे, शकील फरास, उद्योजक सुनील मळेकर, चंद्रकांत भरगुडे, शिवाजी देशमुख, संदीप गोळे, डाॅ. सुदर्शन गोरे, गुणाजी यादव, शैलेंद्र गोडबोले, चिन्मय पंडित, डाॅ. स्वप्निल लिमन, आकाश कबुले, सुभाष हाडके, डाॅ. सुप्रिया धुमाळ, राहुल तांबे, दीपक मळेकर, डाॅ. मंगेश शेणकर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष महेश सोनावणे, सचिव फिरोज पठाण यांनी २०२०-२१ चा रोटरी क्लब शिरवळ-खंडाळाचा वार्षिक अहवाल सादर केला.
यावेळी मावळते अध्यक्ष महेश सोनावणे, मावळते सचिव फिरोज पठाण यांच्याकडून नूतन अध्यक्ष अविनाश वाडकर, नूतन सचिव लक्ष्मण कोंडे यांनी पदभार स्वीकारला.