मणदुरे : मानवाकडून निसर्गावर होणारे अतिक्रमण, वाढती जंगलतोड त्यामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास होतो. निसर्गावरील आघात रोखण्याचा संदेश देत काऊदरा येथील डोंगरावर बियांची उधळण करत निसर्ग पूजा करण्यात आली. पाटण तालुक्यातील निवकणे येथील जानाई देवीची वार्षिक यात्रा सोमवार, दि. ६ व मंगळवारी आहे. यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक येतात. यात्रेनिमित्ताने जेजुरी येथून खंडोबाचा भंडारा घेऊन जानाई देवीच्या यात्रेसाठी पायी पालखी घेऊन निघते. ही पालखी रविवारी सकाळी मणदुरे येथील काऊदऱ्यावर पोहोचली. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील जानाई देवी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले होते. त्यांनी जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा अन् निवकणेच्या जानाई देवीच्या गुलाल आणि बियांची उधळण करत निसर्गाला नारळ अर्पण केला. त्यानंतर निसर्ग पूजा करण्यात आली. मानवाकडून निसर्गावर होणारे अतिक्रमण, जंगलतोड यामुळे वन्यजीवांची साखळी संपुष्टात येत आहे. निसर्गाचे संतुलन राहावे, यासाठी जयाद्री ते सह्याद्री असा प्रवास करत पर्यावरण रक्षण व्हावे, यासाठी जयाद्री मित्र परिवार, पाटण तालुका पत्रकार संघ, पाटण वनविभागातर्फे ही निसर्ग पूजा साजरी केली.ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण बारभाई, किसन बारभाई, अॅड. वसंत नाझीरकर, राजेंद्र बारभाई, शिवाजी कुतवळ, रत्नाकर मोरे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनावणे, नगरसेविका रुक्मिणी जगताप, बारभाई, विक्रमबाबा पाटणकर, ज्ञानदेव गावडे, गोरख नारकर, एस. एम. स्वामी होते. (वार्ताहर)तुळशीच्या पाचशे रोपांचे वाटपयावेळी जानाई देवी ट्रस्टतर्फे सह्याद्रीच्या कडेकपारीत राहून निसर्ग जपणाऱ्या सर्व महिलांचा साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला. जगदंबा प्रतिष्ठान उरळीकांचन यांच्याकडून तुळशीच्या पाचशे रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच फलटणच्या युवकांनी प्लास्टिक गोळा केले.निसर्ग गाणी अन् झिम्मा फुगडीजेजुरी येथून आलेल्या महिला निसर्ग पूजा झाल्यानंतर स्थानिक महिलांसोबत निसर्गाची गाणी गात झिम्मा फुगडी खेळल्या. यामुळे डोंगरावर यात्रेचे स्वरूप आले होते.
उधळलेल्या भंडाऱ्यात बियाही रंगल्या !
By admin | Published: March 05, 2017 11:20 PM