लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात आणून लावण्यात आल्या. तेथेच प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर मिळेल त्या वाहनांनी एसटीचे प्रवासी पुढील प्रवासाला लागले.पहिल्या दिवशी अडीच हजार फेºया थांबल्याया संपात जिल्ह्यातील ३ हजार ७०० कर्मचारी सहभागी झाले असून, मध्यरात्री बारा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुमारे २ हजार ५४६ फेºया रद्द झाल्या.हवा सोडली अन् प्रवेशद्वारात एसटीलांब पल्ल्याचे चालक-वाहक मध्यरात्री प्रवासी व त्यांचे साताºयात हाल होऊ नये म्हणून पुढील प्रवासाला जाण्यास तयार होते. परंतु सातारा जिल्ह्यातील काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी त्याला विरोध केला. गाड्या पुढे जाऊ नयेत म्हणून चाकातील हवा सोडून दिली. तर काहींनी चक्क बाहेर पडण्याच्या मार्गात एसटी आडवी लावली.आगाऊ आरक्षणची रक्कम परतदिवाळीत बहुतांश मंडळी प्रत्यक्ष किंवा आॅनलाईन पद्धतीने आगाऊ आरक्षण करतात. या संपामुळे त्यांचेही हाल झाले. अशा प्रवाशांची तिकिटाची रक्कम त्यांच्या खात्यावर किंवा जेथून आरक्षण नोंद केली आहे. तेथून परत दिली जाणार आहे, अशी माहिती साताºयाचे विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मध्यरात्री एसटीचे अधिकारी महामार्गावरकर्मचाºयांचा संप मध्यरात्री बारा वाजता सुरू झाला. त्यामुळे बारानंतर सर्व गाड्या जवळच्या आगारात जमा केल्या जात होत्या. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्व अधिकारी रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात तळ ठोकून होते. सर्व गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन संपात सामील होण्याचे आवाहन केले जात होते. तसेच मार्गस्थ करण्यास सांगितले जात होते. ज्या चालक-वाहकांनी पुढे जाण्यास नकार दिला. त्या गाड्यांमधील प्रवाशांना वाढे फाटा येथे नेऊन सोडले जात होते.
पुणे-सातारा प्रवास ७०० रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:46 PM