मल्हारपेठ : पाटण तालुक्याला निसर्गसंपदा मोठ्या प्रमाणात लाभली आहे. येथील निसर्गसौंदर्यासह धार्मिक स्थळांचेही तितकेच महत्त्व आहे. त्यातील एक म्हणजे मल्हारपेठपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या येराडवाडी गावचे ग्रामदैवत पांडवकालीन स्वयंभू असे रुद्रे्रश्वर मंदिर होय. पर्यटनाचा क वर्ग दर्जा दिलेल्या या देवस्थानला पर्यटक व भाविकांकडून मोठी गर्दी केली जात आहे.‘क’ वर्ग दर्जा असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत पांडवकालीन लेणीत वसलेल्या या स्वयंभू शंभू महादेव रुद्रेश्वर देवाचा श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भंडारा असतो. याठिकाणी शंभू महादेवाची पांडवकालीन स्वयंभू पिंड आहे. कºहाड-पाटण तालुक्याबरोबर जिल्ह्यात रुद्रेश्वर देवस्थान नावाने प्रसिद्ध आहे. लाखो भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी वनविभाग व ग्रामस्थांनी विविध प्रकारची हजारो वृक्षे लावली आहेत. दाट वनराई असल्याने या परिसरात हरीण, भेकर, मोर लांढोर, ससे, तरस, वानरे इत्यादी वन्य प्राणी मोठ्या संख्येने आढळतात.पांडवकालीन लेणी व स्वंयभू महादेवाची ग्रामस्थांनी सांगितलेली अख्यायिका अशी, पांडवांनी पाटणच्या सरहद्दीवर मारुतीच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. नंतर दापोली येथे शंकराचे लिंग व वाघजाई देवीची स्थापना केली. पाटणपासून दोन किलोमीटर वर येरफळे येथे गुहेत शंकराचे स्थान आहे. तर मल्हारपेठ येथून दोन किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत नवीन कोरीव असे मंदिर उभारले. तर देवस्थान ट्रस्टने २०१२ मध्ये श्रमदानातून जांभ्या दगडांमध्ये पायºया बांधल्या आहेत.श्रावण महिन्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विविध धार्मिक कार्य पार पडतात. स्वयंभू रुद्र्रेश्वर देवस्थानचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले असून, श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.आकर्षक हिरवाईने नटलेल्या उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा अशा या स्वयंभू रुद्रेश्वर देवस्थानाला महाराष्ट्रात शासनाच्या पर्यटन विभागाने ‘क’ वर्ग दर्जा दिला आहे. निसर्गरम्य असलेल्या या देवस्थानास पर्यटकांचा ओढा वाढत आहेत.निसर्गसौंदर्याचा खजिनारुद्रेश्वर येथील मंदिराच्या पूर्वेच्या बाजूस पाण्याचे कुंड आहेत. या ठिकाणी मंदिरावरून कोसळणारा फेसाळणारा आकर्षक धबधबा आहे. मंदिराशेजारी दोन वाघ घळी आहेत. मंदिरापासून डोंगराच्या पायथ्याशी एक कुंड आहे. वीस ते पंचवीस वर्षांनी कडक उन्हाळा ऋतूत त्या कुंडाला पाझर फुटतो. सभोवताली हिरवीगार गवताची झालर आहे. अशा निसर्गसौंदर्याचा खजिना या ठिकाणी आल्यावर भाविक व पर्यटकांना पाहायला मिळतोय.अशी आहे मंदिराची रचनारुद्रेश्वर येथे डोंगरात गुहेत शंभू महादेवाची पिंड आहे. नव्वद फूट उंच अणि तीन फूट लांब असलेल्या लेण्याचा घेर पंचवीस फूट आहे. या लेण्याच्या मध्यभागी शिवलिंग स्थापित केले. या लेण्याची अंतर्गत रचना प्रसिद्ध अजंठा लेणी दोनसारखी आहे. शिवलिंगाच्या भोवती चोवीस खांब आहेत. मंदिराशेजारी भंडारागृह व त्यामध्ये १२ ते १४ लोकांना बसता येईल, अशी आसने आहेत.
श्रावणात बहरतेय ‘रुद्रेश्वर’ क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:09 PM