वाठार स्टेशन : देशाच्या राजधानीत राजमा या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही ? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे. कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. आजपर्यंत इथला शेतकरी कायम दुष्काळी संकटाचा सामना करत आला आहे. घेवडा पिकासाठी लागणारे पोषक वातावरण या भागात असल्याने हा भाग घेवडा उत्पादनात अग्रणी मानला जातो. तसेच या पिकावर या भागातील अनेक शेतकºयांचे वर्षाचे अर्थचक्र अवलंबून आहे. मात्र, या पिकाचा समावेश पीक विम्यात नसल्याने तसेच या पिकास कोणताही हमीभाव नसल्याने या पिकाची दिल्ली दरबारी कायम निराशा राहिली आहे. कोरेगावतल्या शेतकºयांची दिवाळी राजम्याच्या दर आणि उत्पादनावर अवलंबून असते. मात्र, यंदाचा घेवड्याचा दर पाहिला तर कापूस, कांदा उत्पादन करणाºया शेतकºयांची अवस्था झाली आहे. यापेक्षा बिकट अवस्था घेवडा उत्पादन करणाºया शेतकºयांची झाली आहे. कोरेगावातला घेवडा दिल्ली बाजारी राजमा नावाने विकला जात असला तरी परदेशातून केलेल्या आयातीच्या प्रमाणावर घेवड्याचा दर निश्चित होत असतो. गेल्या काही वर्षात रुपयाचे जागतिक मुल्य कमी झाल्यामुळे आयातीवर प्रतिकूल परिणाम होऊन घेवड्याची आयात कमी झाली. परिणामी घेवड्याचा भाव वधारला होता. यंदा मात्र पावसाने अगोदरच पाठ फिरवली आहे. पर्यायाने घेवड्याचं उत्पन्न कमी होऊन सुद्धा दर मात्र गेल्यावर्षीपेक्षा फारच कमी आहेत. टिकाव लागणं अशक्य...शेतकºयांना थेट दिल्लीचा दर मिळावा म्हणून देऊर येथील एका सामाजिक संस्थेने राजम्याचं पेटंट देखील मिळविलं होतं. पण, प्रचंड भांडवल आणि भांडवलदारांच्या स्पर्धेत कोणाचाच टिकाव लागणं शक्य नाही. त्यामुळे पर्यायाने शेतकरी हतबल होऊन व्यापारी घेईल त्याच दराने घेवडा विकताना दिसत आहे. अशापद्धतीन संकटांचा सामना करणाºया कोरेगावच्या शेतकºयांपुढे पुढीलवर्षी राजमा करायचा की नाही हाच एक प्रश्न उभा ठाकला आहे. |
कोरेगावचा राजमा दराअभावी पुन्हा धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:57 PM
देशाच्या राजधानीत राजमा या नावाने प्रसिद्ध असलेला कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील घेवडा यंदा दराअभावी पुन्हा अडचणीत सापडला आहे. यामुळे पुढच्यावर्षी राजमा पिकवायचा की नाही ? असा प्रश्न घेवडा उत्पादक शेतकºयांना पडला आहे.
ठळक मुद्देदराअभावी शेतकºयांपुढे संकट पुढीलवर्षी पिकवायचा की नाहीचा प्रश्न उभा भांडवलदारांच्या स्पर्धेत टिकाव लागणं अशक्य...कोरेगावतील घेवडा दिल्ली बाजारी राजमा