आॅनलाईन लोकमत
सातारा दि. २६ : सातारा जिल्ह्यात दि. २८ व २९ रोजी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक कोणत्या मागार्ने व कोणत्या वेळी काढावी अथवा काढू नये, या संबंधाने वाहतुकीचे नियमन करणे, तसेच मिरवणुकीतील व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घातलेले निबंर्धांचे पालन व्हावे व लाऊड स्पीकरचा वापर योग्य प्रकारे व्हावा याकरीता पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम १९९१ चे कलम ३६ लागू केले आहे.
पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्ताकामी नेमलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना दि. २८ ते २९ एप्रिल या कालावधीकरिता त्या-त्या पोलिस ठाणे हद्दीतील जनतेचे स्वास्थ्य, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मिरवणुकीच्या मागार्संबंधाने मिरवणुकीतील व्यक्ती अथवा व्यक्तींच्या समूहाचे वर्तन कसे असावे, ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निबंर्धांचे पालन व्हावे या दृष्टीने आवश्यक ते सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. याची सर्व संबंधितांनी नोंद घेऊन कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असेही पाटील यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)